Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात, असा करा बॅलेन्स चेक

Ladki Bahin Yojana December 1500 Rupees Installment Recieved: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे १५०० जमा होण्यास सुरुवात

फक्त एका महिन्याचा हप्ता जमा

मकरसंक्रातीआधीच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात आजपासून १५०० जमा झाले आहेत. आजपासून पैसे जमा झाले आहेत. महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी पैसे येतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.

डिसेंबरचे १५०० रुपये तुम्हाला आले का?

लाडकी बहीण योजनेत आजपासूनच १५०० रुपये जमा झाले आहेत. सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जाणार आहेत. याआधीच अनेक मंत्र्यांनी घोषणा केली होती. मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात ३००० रुपये येतील, असं सांगितलं होतं. मात्र, त्यातील एकच १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात थोडी निराशा झाली आहे.

पैसे आले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊनदेखील पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती मिळणार आहे. याचसोबत बँकेत जाऊनदेखील तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.

जानेवारीचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, याविरोधात काँग्रेसने निवडणुक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही अग्निम स्वरुपात पैसे देऊ शकत नाही, त्यामुळेच महिलांना फक्त एका महिन्याचे पैसे मिळाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर पैसे दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB New Home Ground: चिन्नस्वामी नाही तर ही २ स्टेडियम असणार RCB ची होम ग्राऊंड? IPL 2026 पूर्वी होणार मोठा निर्णय

Skin Care : ऑईली स्किनसाठी ५ घरगुती फेस मास्क, एकदा ट्राय करा

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडाला; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक

Maharashtra Live News Update : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, ७ फेब्रुवारीला धुरळा उडणार

गावांत,खेड्यापाड्यात धुरळा उडाला; पुण्यासह १२ ठिकाणी जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा, मतदान आणि निकाल कधी?

SCROLL FOR NEXT