Ladki Bahin July Installment meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलैचा १५०० रुपयांचा हप्ता मिळणार का? लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही, ई - केवायसीची स्थिती आणि ऑनलाइन तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र ईकेवायसी आणि पडताळणीनंतर लाखो महिलांच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विविध निकषांनुसार अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असून अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे ऑनलाइन अवघ्या काही मिनिटांत तपासता येते.

यादीत नाव तपासण्याची प्रोसेस

तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. पुढे अर्जाची स्थिती किंवा लाभार्थी यादी हा ऑप्शन निवडा. पुढे आधार नंबर किंवा अर्जाचा नंबर टाकल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही, तसेच लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

कोणत्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार?

जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल, सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली असेल आणि तुम्ही योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असाल तर जुलै महिन्याचा १५०० चा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण पडताळणीत अपात्र ठरलेल्या किंवा ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो.

जुलैचा हप्ता कधी येणार?

तर जुलै महिन्याचा हप्ता हा १२ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. जर असं झालं नाहीतर २०२४ प्रमाणे रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ एकत्र म्हणजे ३००० रुपये खात्यात वितरीत केले जाऊ शकतात. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT