Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: कार असणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र, दुचाकी असलेल्यांचं काय?

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु केली आहे. यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून चारचाकी वाहन असलेल्या महिलांना बाद करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तर त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका चौकशी करणार आहे. मात्र,दुचाकी असल्यावरदेखील योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये जर चारचाकी वाहन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. परंतु ज्या कुटुंबाकडे महागड्या दुचाकी आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र,जर महिला किंवा तिच्या कुटुंबात महागडी दुचाकी असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

मात्र, निकषांमध्ये दुचाकीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.त्यामुळे आता दुचाकी असणाऱ्या लाडक्या बहि‍णींना लाभ मिळणार का?याबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत पुण्यातील तब्बल ७५००० महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असल्याचे निष्पण झाले आहे. त्यामुळे या महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT