Ladki Bahin Yojana eKYC Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय; महिला व बालविकास विभागाने दिली ईकेवायसीवर महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana Big Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करता येणार नाहीत, असं सरकारने सांगितलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसी न केलेल्या महिलांना कागदपत्र सादर करायची नाहीत

महिला व बालविकास विभागाने दिली माहिती

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी केल्याशिवाय महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत.याची अंतिम मुदत आता संपली आहे. दरम्यान, राज्यातील लाखो महिलांनी केवायसी केलेले नाही. या महिलांचा लाभ बंद केला आहे.फक्त केवायसी केलेल्या आणि पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, आता ज्या महिलांना केवायसी करण्यास अडचणी आल्या आहेत त्यांना महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर आता केवायसी न केलेल्या महिलांनाही कागदपत्रे सादर करायचे असल्याचे अनेक महिलांना वाटले. परंतु याबाबत आता सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

केवायसी न केलेल्या महिलांना दिलासा नाहीच

लाडकी बहीण योजनेत केवायसी न केलेल्या महिलांनाही महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करता येणार असल्याचा समज अनेक महिलांचा झाला. परंतु असे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सरकारने दिली माहिती (Ladki Bahin Yojana Government Big Decision)

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे, असं महाराष्ट्र सरकारने सांगितले.

यामुळे केवायसी न केलेल्या महिलांना दिलासा मिळालेला नाही. या महिलांचा लाभ बंद झाला आहे. त्यांना भविष्यात योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. त्यामुळे महिलांना अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT