Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार,आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार?

Ladki Bahin Yojana August Month Installment Update: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असं सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?

सप्टेंबर महिना सुरु झाला अद्याप महिलांच्या खात्यात पैसे नाहीत

ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

सप्टेंबर महिना सुरु झाला आहे. अजूनही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यानस लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरु झाली तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही. दरम्यान, आता गौरीपूजननिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषमा होण्याची शतक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे दोन-तीन दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana August September Installment May Come Together)

आता सप्टेंबर महिना सुरु झाल्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल. त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

२६ लाख महिलांचे अर्ज बाद

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत २६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे.दरम्यान, आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केले जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Winter Season : हिवाळ्यात लसूण का खावा? जाणून घ्या फायदे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राज्यातील सर्व गुंडांचा भरणा; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Mesh Rashi: २०२६ वर्ष मेष राशींसाठी कसं जाणार? साडेसातीतून होणार का सुटका? वाचा राशीभविष्य

Black Saree Blouse Designs : मकर संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा 'हे' फॅशनेबल ब्लाउज, सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील

SCROLL FOR NEXT