Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे ८ दिवस! लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार?

Majhi Ladki Bahin Yojana August Installment Date: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याचे शेवटचे ८ दिवस उरले आहेत त्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार

या तारखेला ऑगस्टचे १५०० येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता हा लांबणीवर गेला होता. जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. महिलांना ऑगस्टचे १५०० कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहेत. त्यात आता महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ऑगस्टचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana August Month Installment)

लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता ऑगस्ट महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे या ८ दिवसात पैसे येणे गरजेचे आहे. जर हे पैसे येत्या ८ दिवसांत महिलांच्या खात्यात जमा झाले नाही तर हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः ट्विट करत माहिती देतात. त्यांनंतर हप्ता दिला जातो. यंदा रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळाली होती. त्यामुळे आता ऑगस्टच्या हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये (These Women Will Not Get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास लाखो महिलांनी निकषांमध्ये न बसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांची आता पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची चौकशी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना आता १५०० रुपये मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना काय आहे?

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली आहे.

लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये जर महिला बसत असतील तर त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये महिलांचे उत्पन्न २.५ लाख रुपये असावे हवे. तसेच महिला सरकारी कर्मचारी नसाव्या. महिलांकडे चारचाकी वाहन नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT