Augest installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana August Installment: लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २४ सप्टेंबरनंतर १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच १,५०० जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो.

२४ सप्टेंबरनंतर पैसे जमा होणार?

मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ही सध्या संभाव्य तारीख असून सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे निश्चित तारीख अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार लाभ

ई-केवायसी प्रोसेसनंतर लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख असल्याची माहिती आहे. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBTच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाते.

ऑगस्टचा हप्ता का रखडला?

ऑगस्ट महिन्याचा हप्ता आधीच मिळेल, अशी लाभार्थी महिलांना अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे. आता वितरणाची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

जुलैचा हप्ता जमा झाला, आता ऑगस्टची प्रतीक्षा

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयाच्या हप्त्याची महिला वाट पाहतायेत. गणेशोत्सवाच्या काळात सरकारकडून महिलांना आर्थिक मदतीने गिफ्ट मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT