Ladki Bahin Yojana Update  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० गणेशोत्सवात मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana August Installment Date: लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये सप्टेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट

  • लाडकींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये या महिन्यात मिळणार

  • लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सण गोड होण्याची शक्यता

  • गौरी-गणपतीत लाडकींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याचा अंदाज

  • सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. लााडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले. आता लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. अशामध्ये याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकार लाडक्या बहिणींचा गणेशोत्वस सण गोड करण्याच्या तयारीत आहेत. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये गौरी-गणपती सणात मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला तरी देखील लाडकींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे ते पैसे कधी येणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये लाडकींना गौरी-गणपती उत्सवादरम्यान आर्थिक मदत मिळेल असा अंदाज आहे. कारण सरकारने नेहमी सणाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जाम केले आहेत. त्यामुळे यावेळी देखील गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये १६ सप्टेंबरनंतर मिळण्यास सुरूवात होईल असा अंदाज आहे. दरम्यान,सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना १५०० रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या खात्यात जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना सल्ला दिला जातो की, त्यांनी त्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडावीत आणि त्यांचा DBT पर्याय सक्रिय असल्याची खात्री करावी. जेणेकरून हप्ता वितरित होताच निधी कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल.

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला १,५०० ची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना फडणवीस सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० ची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT