Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी 6 महिन्यांची मुदत वाढवली का? अदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेच्या e-kyc प्रक्रियेबाबत अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. जुलै हप्ता, संभाव्य तारीख, १५०० हप्ता वाढ आणि सरकारची भूमिका जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेच्या e-KYC प्रोसेसची मुदत वाढणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात होता. कारण आत्तापर्यंत याच कारणांमुळे महिलांचे लाभ वगळ्यात आले आहेत. त्यातच e-KYC प्रोसेस अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

तसेच माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेतली e-KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने ६ महिन्यांची मुदत याआधी दिली आहे. मात्र ज्या महिलांची e-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही किंवा प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या होत्या त्यांच्याबद्दल पुढे सरकारसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल. तर पात्र लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगिलतं आहे. त्यामुळे ही माहिती लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे.

जुलैचा हप्ता कधी मिळणार?

जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण मागच्या काही हप्त्यांची तारीख पाहता जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. पण लाभार्थींनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे.

हप्ता वाढणार का?

काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता वाढवण्याची मागणी केली आहे. यावर अदिती तटकरे म्हणाल्या की, हप्ता वाढवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे १५०० रुपयांचा पुढील हप्ता नेहमीप्रमाणे येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Death News : ८ वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT