Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Ladki Bahin Yojana 9526 Women Ineligible: लाडकी बहीण योजनेत जवळपास ९५२६ राज्य सरकारी निवृत्त महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेतून महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेतून ९५२६ महिलांचे अर्ज बाद

  • राज्य सरकारी निवृत्त महिलादेखील घेत होत्या योजनेचा लाभ

  • पडताळणीत धक्कादायक माहिती समोर

लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. जवळपास ५० लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, या योजनेत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. याचसोबत अनेक सरकारी सेवानिवृत्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ (Retired Government Employees Take Benefit of Scheme)

लाडकी बहीण योजनेत झालेले एकेक घोटाळे समोर येत आहे. आधी १४ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता जवळपास ९५२६ सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या महिला राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत.

राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झाल्या असतानाही या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना कर्मचारी निवृत्ती वेतन मिळते. तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहेत. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. यामुळे जवळपास ९ हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ (Ladki Bahin Yojana Ineligible Women Take Benefit)

या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या अटींमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तरीही या महिला महिन्याकाठी १५०० रुपये घेत आहेत. यामुळे आता या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेतून महिलांचे अर्ज का बाद केले?

या महिलांनी योजनेचे निकष पूर्ण न करता अर्ज केले होते. विशेषतः सरकारी कर्मचारी व निवृत्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले?


जवळपास ५० लाख महिलांचे अर्ज योजनेतून वगळण्यात आले आहेत.

निवृत्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?


नाही. योजनेच्या अटींनुसार, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही.

लाडकी बहीण योजनेत किती रुपये दिले जातात?


या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT