Ladki Bahin Yojana June Installment google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांचे १५०० बंद, आणखी १२ लाख महिलांना का वगळलं? कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana June Installment Update: लाडकी बहीण योजनेतल्या ९२ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून का वगळण्यात आली. यामागील कारणे, पात्रता निकष, पडताळणी प्रक्रिया आणि शासनाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या लाखो महिला घेतात. लाभार्थी महिलांना यामध्ये दरमहा १५०० रुपयांचा निधी दिला जातो. पण यातून आत्तापर्यंत ९२ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. हा आकडा आधी ८० लाखांचा होता. त्यामध्ये आणखी १२ लाख महिलांची नावे वगळ्यात आली. यामागचे कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

लाडकी बहीण योजनेवरून सध्या राजकारणही तापले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या योजनेतून ९२ लाख महिलांची नावं वगळ्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला. हा दावा खरा असेल तर मोठ्या संख्येने महिलांना योजनचा लाभ बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, ९२ लाख महिलांची नावे वगळल्याच्या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या म्हणण्यांनुसार, सध्या राज्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या १ कोटी ६७ ते ७० लाख महिला लाभार्थी आहेत आणि त्यांना नियमितपणे योजनेचा लाभ दिला जात आहे.

आदिती तटकरे यांनी बीड जिल्ह्याचं उदाहरण देत सांगितलं की, तिथे सहा ते साडेसहा लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार ते साडेचार लाख महिला पात्र ठरल्या आणि त्यांनाच लाभ दिला जात आहे. त्यामुळे ९२ लाख महिलांची नावे वगळ्याचा दावा चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.

तर आत्तापर्यंत जे लाभार्थी होते, ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी आणि काही पुरुष या योजनेचा लाभ घेत असलेल्यांची पडताळणी केल्यानंतर या सर्वांना लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana June Installment Update) वगळण्यात आलं. तर जून महिन्याचा लाभ हा १५ ते १७ जुलै रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: महागडे टोनर नको! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी तयार करा गुलाबपाणी; त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो

काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय करताय? डॉक्टरांनी सांगितल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

एकदा खाल तर खातच राहाल अशी कुरकुरीत ओव्याच्या पानांची भजी

Pune Crime: नणंद- भावजयमध्ये टोकाचा वाद, ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्वक ओतलं; पुण्यातील संतापजन घटना

SCROLL FOR NEXT