Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येणार की नाही? या सोप्या पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana Status: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने महिलांना १५०० रुपये दिले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना पुढचा हप्ता मिळणार की नाही हे सोप्या पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केली आहे. त्यामुळे आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. परंतु २१०० रुपये हे एप्रिल महिन्यापासून दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेची घोषणा केल्यानंतर २१०० रुपये दिले जातील.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सहावा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही हे सोप्या पद्धतीने चेक करा. (Ladki Bahin Yojana)

या पद्धतीने चेक करा स्टेट्‍स (Ladki Bahin Yojana Status)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही स्टेटस चेक करु शकतात. सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. https://testmmmlby.mahaitgov.in/ या लिंकवर जायचे आहे. त्यानंतर होमपेजवर लॉग असा ऑप्शन येईल. त्यानंतर खाली तुम्हाला लाभार्थ्यांचा स्टेट्स दिसेल.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची यादीदेखील जाहीर होत असते. या यादीत तुमचे नाव असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेची ही यादी डाउनलोड करण्यासाठी गुगलवर सर्वप्रथम तुमच्या शहराच्या महानगरपालिकेच नाव टाकायचं आहे. जर धुळे हे तुमचे शहर असेल तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हा पर्याय दिसेल. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल. यात तुम्ही तुमचे नाव चेक करु शकतात. (Ladki Bahin Yojana List)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भयंकर घटना! क्रिकेट खेळण्यापासून रोखलं, अल्पवयीन मुलाचा सुरक्षारक्षकावर हल्ला

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT