Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹६००० जमा होणार; ४ महिन्याचा हप्ता एकत्र येणार?

Ladki Bahin Yojana ₹6000 Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ईकेवायसीतील दुरुस्ती झाल्यानंतर रखडलेले सर्व हप्ते महिलांना एकत्र दिले जाऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेत महिलांना ₹६००० मिळणार

चार महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींना आता ६००० रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. चार महिन्यांचा हप्ता महिलांना एकत्र मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थ्यांनी केवायसीत दुरुस्ती केली आहे त्यांच्या खात्यात एकत्र तीन महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.

लाडक्या बहिणींना ६००० रुपये एकत्र मिळणार (Ladki Bahin Yojana 600 Rupees Installment Update)

राज्यातील कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या महिला निकषात बसतात आणि ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनाच पैसे मिळत आहेत. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. केवायसीमध्ये चुकी झाल्यामुळे महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.

ज्या महिलांनी केवायसीत प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आहेत. त्यांना दुरुस्तीची एक संधी दिली आहे. ३१ मार्चपर्यंत पुन्हा एकदा केवायसी करायची आहे.केवायसी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे चारही महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिली होती माहिती (Ladki Bahin Yojana News)

मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवेळी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये एका सभेत एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या लाडक्या बहि‍णींना ईकेवायसीतील प्रक्रियेमुळे लाभ मिळालेला नाही त्यांना ३ महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील, असं त्यांनी सांगितले होते. दरम्यान, त्यानंतर आता या लाडक्या बहि‍णींना मार्चचा हप्तादेखील त्याच हप्त्यात मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. जर केवायसीतील त्रुटींमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना ४ महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर महिलांच्या खात्यात ६००० रुपये दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT