Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 5 लाख लाडक्या अपात्र? लाडकींची संख्या आणखी घटणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana Update : राज्यातल्या तब्बल पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. यातल्या अनेक लाडकींनी घाबरून दावा सोडलाय. नेमक्या का घाबरल्या आहेत लाडक्या बहिणी? लाखो लाडक्या बहिणी अपात्र होण्याचं कारण काय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीने अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतलाय. यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनीच शिक्कामोर्तब केलंय. एवढंच नाही तर त्यांनी अपात्र लाडक्या बहिणींची आकडेवारीच जाहीर केलीय.

5 लाख लाडक्या अपात्र ?

- 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला - 1 लाख 10 हजार

- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला - 2 लाख 30 हजार

- चारचाकी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी- 1 लाख 60 हजार

एकूण अपात्र - 5 लाख

ही तर सुरुवात आहे, आणखी लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जातील, असा दावाच खासदार संजय राऊतांनी केलाय. तर एखादी योजना सुरु केली तर ती बंद करणे योग्य नाही म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढत असल्याने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावलाय. डिसेंबरमध्ये 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाभ देण्यात आला होता. मात्र आता हा आकडा 2 कोटी 41 लाखांवर आलाय. त्यामुळे महायुती सरकार आणखी किती लाडक्या बहिणींवर योजनेतून बाहेर काढणार आणि निवडणुकीच्या काळात दिलेलं 2100 रुपयांचं वचन कधी पूर्ण करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT