Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना १० ऑक्टोबरला मिळणार ३००० रुपये; कसं? जाणून घ्या

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेची संपूर्ण देशात चर्चा आहे. शिंदे सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. वर्षाला १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. (Ladki Bahin Yojana)

अजित पवारांनी बीडमधील माजलगाव येथील सभेत अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी बहि‍णींना भाऊबीज म्हणून ३ हजार रुपये देणार आहे, असा अजित दादांचा वादा आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे आता दिवाळीपू्र्वी महिनांच्या खात्यात ३ हजार रुपये येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्षे चालू राहील. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले.त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला ३००० रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana 4th Installment)

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना आतापर्यंत ३००० रुपये मिळालेत त्यांना १५०० रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याच्या पहिल्याच दिवशी ५१२ कोटी रुपये दिले असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur News : माळीण व इरसलवाडीच्या पुनरावृत्तीची शक्यता; कसारा येथे भूस्खलनाने घर कोसळले

Nagpur : तिघांचे हातपाय बांधले होते, मग स्वत: गळफास घेतला, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चौकशी होणार; राज्य सरकारचा निर्णय

Ayushman Bharat: आयुष्मान भारत कार्ड हरवलंय? टेन्शन घेऊ नका, ही सोपी प्रोसेस करा मोफत उपचार होईल

Vastu Shastra For Dining Table: डायनिंग टेबलवर 'या' गोष्टी ठेवत असाल तर आजच काढून टाका; नात्यांमध्ये येईल दुरावा

SCROLL FOR NEXT