Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin yojana : ₹१५०० चा हप्ता बंद का झाला? लाडक्या बहिणींना ‘या’ कार्यालयात समजणार नेमके कारण; ३००० रूपयांची अपडेट समोर

why ladki bahin yojana payment stopped : लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता बंद का झाला? ईकेवायसीनंतर ७० लाख महिलांचा लाभ थांबला आहे. ३००० रुपयांच्या नव्या अपडेटबाबत सविस्तर माहिती वाचा.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana, ₹1500 installment eKYC update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या ईकेवायसीची प्रक्रिया सुरू आहे. ३० एप्रिलपर्यंत लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करता येणार आहे. ईकेवायसीनंतर राज्यातील अनेक अपात्र लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ७० लाख महिलांचा १५०० रूपयांचा लाभ बंद झाला आहे. कोणत्या कारणामुळे ७० लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला? पात्र असतानाही तुमचा लाभ बंद झाला का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप समजले नाही. पण हे उत्तर आता मिळणार आहे. तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल, अथवा बंद झाला असेल.. तर तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात लाभ बंद का झाला? याचं कारण समजणार आहे.

राज्यातील २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता. पण ईकेवायसीनंतर यातून अनेकांची नावे वगळण्यात आली. पण पात्र असतानाही अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. पात्र असताना लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात तक्रार करता येणार आहे. तुमच्या तक्रारीनंतर तपासणी करून त्या अर्जाचा पुन्हा विचार केला जाईल. दरम्यान, राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना एप्रिल अखेरीस ३ हजार रूपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा लाभ एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांकडे चारचाकी वाहने निघाली. त्याशिवाय ६५ वर्षांवरील अनेक महिलाही लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले. तर काही महिलांचा ‘ई-केवायसी’ चुकल्यामुळे लाभ बंद झाला आहे. राज्यातील अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीनंतर लाभ बंद झाला. परंतु, लाभ बंद झाल्याचे कारण त्यांनाच समजलेले नाही. महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात याचं कारण समजणार आहे. लाभ बंद होण्याचे नेमके कारण, अधिकारीच सांगतील. जिल्हाधिकाऱ्यांकडील लॉगिन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद का झाला, याची माहिती तथा कारण महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून मिळेल. कोणत्या निकषांत त्या महिला लाभासाठी अपात्र ठरल्या, याचे नेमके कारण तेथे समजू शकते, अशी माहिती पुण्यातील महिला विकास विभागातील आधिकारी जामसिंग गिरासे यांनी सकाळला दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT