Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana 30 Lakh Women Benefit Will Stopped: लाडकी बहीण योजनेत आता ३० लाख लाभार्थी महिलांचा लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांनी केवायसी केलेले नाही. त्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

३० लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार

केवायसी न केल्याने लाखो महिलांना फटका

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ३००० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मकर संक्रांतीला लाडक्या बहि‍णींना डबल खुशखबर मिळणार आहे. ३००० रुपये एकत्र येणार असल्याने महिलांना खूप आनंद झाला आहे. याचसोबत आता लाखो महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण काय ते जाणून घ्या.

३० लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होणार (Ladki Bahin Yojana 30 Lakh Women Will not Get 1500 Rupees Benefit)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील काही महिलांनी केवायसी केली आहे. राज्यातील जवळपास ३० लाख महिलांनी केवायसी न केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे या लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये महिलांच्या पतीची आणि वडिलांची केवायसी करणे अनिवार्य आहे. या केवायसीमध्ये जर महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

केवायसी न केल्यास लाभ बंद (Ladki Bahin Yojana KYC Update)

राज्यातील जवळपास ३० लाख लाडक्या बहि‍णींनी केवायसी पूर्ण केली नाहीये. यातील सव्वा लाख महिला या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. केवायसीसाठीची मुदतवाझ संपली आहे. ही मुदत वाढवून मिळेल, अशी आशा महिलांनी होती. मात्र, सध्या तरी मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ३० लाख लाडक्या बहि‍णींना पुढचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT