Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर लाडक्या भावांचा डल्ला, तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला महिन्याला १५०० रुपयांचा लाभ

Ladki Bahin Yojana 14298 Mens Get Benefit: लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जवळपास १४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल १४२९८ पुरुषांनी घेतला

२१.४४ कोटी रुपयांचे नुकसान

तब्बल १० महिने घेत होते लाभ

लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर चक्क लाडक्या भावांनी डल्ला मारला आहे. जवळपास १४२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या पुरुषांच्या खात्यात दर महिन्याला पैसे जमा केले जायचे. यामुळे सरकारने मोठे नुकसान झाले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दहा महिने पुरुषांनी घेतला लाभ

आतापर्यंत या पुरुषांनी चक्क दहा महिने या योजनेचा लाभ घेतला आहे. दहा महिने प्रत्येकी १५०० रुपये या पुरुषांच्या अकाउंटमध्ये जमा केले जायचे. या पुरुषांना २१,४४ कोटी रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता लाडक्या भावांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे.

ऑगस्ट २०२४ पासून या महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. ऑगस्ट ते जून असे १० महिने पुरुषांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. दहा महिने हे पुरुष योजनेचा लाभ घेत आहे, हे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत डेट्याची पडताळणी केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

लाडकी बहीण योजनेवर सरकारला वर्षभरात ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातील जवळपास २१.४४ कोटी रुपये पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु केली होती. या योजनेला सर्वाधिक निधी जात असल्याने इतर योजनांना मात्र फटका बसत आहे.

पुरुष असूनही महिलांची नावे

या पडताळणीत अजून एक माहिती समोर आली आहे की, २३६०१४ लाभार्थी असेल आहे की त्यांच्या नावाबद्दल संशय आहे. हे पुरुष असून त्यांनी महिलांनी नावे देऊन लाभ घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अर्जांची छाननी सुरु आहे. त्यामुळे या पुरुषांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत किती पुरुषांनी लाभ घेतला?


या योजनेत १४,२९८ पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून दर महिन्याला १५०० रुपये घेतले आहेत.

हा गैरप्रकार कधीपासून सुरु होता?

ऑगस्ट २०२४ पासून जून २०२५ पर्यंत या पुरुषांनी तब्बल दहा महिने योजना लाभ घेतला आहे.

सरकारचं किती नुकसान झालं?

या गैरवापरामुळे सरकारचं २१.४४ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

कारवाई काय केली?

संशयास्पद लाभार्थ्यांची तपासणी सुरु असून, दोषी पुरुषांचे खाते बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT