women government schemes google
बिझनेस

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

Government Schemes for Women: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या पुढील ५ महत्त्वाच्या योजनांची माहिती जाणून घ्या. बचत, कर्ज, गॅस सुविधा आणि गर्भवती महिलांसाठी या योजना फायद्याच्या ठरतील.

Sakshi Sunil Jadhav

महिलांसाठी सरकारच्या ५ योजना फायद्याच्या आहेत

बचत, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगारासाठी सरकारी योजना

महिलांना या योजनेचा आत्तापर्यंत भरपूर फायदा झाला आहे

प्रत्येक महिलेला वाटतं की, आपल्याकडे भविष्यासाठी थोडी रक्कम शिल्लक असावी. अर्थात महागाच्या दिवसांमध्ये जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे आर्थिक नियोजनात बदल करावा लागतो. पण तुम्ही सरकारच्या काही योजनांमध्ये अर्ज करून भविष्यात चांगला लाभ मिळवू शकता. तसेच तुम्हाला बचतीची सवय आणि स्वयंरोजगाराच्या संधीही यामध्ये मिळतील.

सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवतं. पण बऱ्याच महिलांना याबद्दल माहितीनसते. पुढील बातमीत आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

राज्य सरकारकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. त्यामध्ये महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता मिळतो. यामध्ये पात्र महिलांनाच लाभ मिळतो.

२. सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी बचत सरकारची ही बचत योजना आहे. यामध्ये १० वर्षांखालील मुलींसाठी खातं उघडता येतं. एका कुटुंबातल्या २ मुलींनाच याचा लाभ घेता येतो. तर खात्यात जमा केलेले पैसे २१ वर्षानंतर मॅच्युरिटी झाल्यावर मिळतात. याचा मुलींना खूप फायदा होतो.

३. प्रधान मंत्री मातृ वंदना योजना

ज्या महिला गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या आहेत, त्यांना आर्थिक मदत म्हणून प्रधान मंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हाला यासाठी सरकारी नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, गर्भधारणा नोंदणी प्रमाणपत्र आणि बॅंक खातं हेच आवश्यक पुरावे लागतात.

४. उज्वला योजना

ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांच्यासाठी सरकारने उज्वला योजना सुरु केली आहे. तसेच यामध्ये BPL कुटुंबातील महिला आणि SECC यादीमध्ये नाव असलेल्या महिलांनाच लाभ मिळतो. यासाठी आधार आणि रेशन कार्ड आवश्यक आहे.

५. महिला समृद्धी कर्ज योजना

महिलांना व्यवयासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी सरकारने ही खास योजना सुरु केली आहे. यामध्ये पात्रता महिला उद्योजक किंवा स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्छा असलेल्या महिला हीच आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच अर्जासाठी तुम्ही याच अधिकृत वेबसाईला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला तिथेच अर्ज करता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT