Kanya Sumangala Yojana Saam Tv
बिझनेस

Kanya Sumangala Yojana: सरकारी योजनेत मुलींना मिळतात ७५,००० रुपये; कन्या सुमंगला योजना आहे तरी काय?

Kanya Sumangala Yojana For Girls: उत्तर प्रदेश सरकारने महिलांसाठी खास कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना ७५,००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

मुलींसाठी सरकारची खास योजना

मुलींच्या शिक्षणासाठी राबवली कन्या सुमंगला योजना

मुलींना मिळणार ७५,००० रुपये

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी योजना राबवल्या आहेत.केंद्र सरकारसोबतच इतर राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने महिलांसाठी खास कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना ७५००० रुपये दिले जातात.

मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षण आणि लग्नासाठी मदत मह्णून हे पैसे दिले जातात. या योजनेत मुलींना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.

उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेत १ एप्रिल १०१९ नंतर जन्मलेल्या मुलींना मदत केली जाते. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये दिले जातात. मुलींच्या संगोपनासाठी त्यांच्या आईवडिलांना हे पैसे दिले जातात. मुलगी एक वर्षाची झाल्यावर तिला लस दिली जाते. यावेळी २००० रुपये दिली जाते.

मुलींच्या शिक्षणासाठी मदत

मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मदत रेली जातात. मुलींना वेगवेगळ्या वर्गात आर्थिक मदत केली जाते. मुलगी पहिलीला गेल्यावर ३००० रुपये दिले जातात. यानंतर सहावी आणि नववीत प्रत्येकी ३००० रुपये दिले जातात. मुलींना चांगले उच्च शिक्षण मिळावे, म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.

कागदपत्रे

मुलींनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा त्या डिग्री किंवा डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतात तेव्हा त्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत अर्ज करताना मुलींचे फोटो, शाळेच्या अॅडमिशनचे कागदपत्र, निवासी प्रमाणपत्र हे कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे. मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT