जिओने १०० रुपयांचा नवीन "सेलिब्रेशन अॅड-ऑन पॅक" लाँच केला.
या पॅकमध्ये ३० दिवसांसाठी ५ जीबी डेटा आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध.
ग्राहकांना झोमॅटो, जिओसावन, नेटमेड्स, अजिओवर खास सूट मिळणार.
हा पॅक मायजिओ अॅप आणि अधिकृत वेबसाइटवर खरेदी करता येईल.
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर म्हणून केवळ १०० रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन देशभरात उपलब्ध असून तो कंपनीच्या ९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "सेलिब्रेशन अॅड-ऑन पॅक" म्हणून लाँच करण्यात आला आहे. या पॅकमध्ये ३० दिवसांच्या कालावधीसाठी ५ जीबी डेटा मिळतो. ठरवलेली डेटा मर्यादा संपल्यानंतर ग्राहक इंटरनेटचा वापर करू शकतात. परंतु त्याचा स्पीड ६४ केबीपीएसवर मर्यादित राहील.
या पॅकची खासियत म्हणजे यात जिओहॉटस्टार मोबाईल किंवा टीव्हीचे ३० दिवसांचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. त्यामुळे ग्राहकांना केवळ डेटा मर्यादेपूरते फायदे मिळत नाहीत, तर मनोरंजनासाठी अतिरिक्त पर्याय देखील मिळतात. याशिवाय, कंपनीने या पॅकसोबत एकापेक्षा अधिक आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. जिओ गोल्ड सेवेत २% अतिरिक्त फायदा, नवीन कनेक्शनवर JioHome ची दोन महिन्यांची मोफत चाचणी, तर रिलायन्स डिजिटलमध्ये निवडक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ३९९ रुपयांपर्यंत सूट ग्राहक मिळवू शकतात. त्याचप्रमाणे अजिओवर १००० रुपयांहून अधिक खरेदी केल्यास २०० रुपयांची सूट मिळणार आहे.
मनोरंजन आणि जीवनशैली सेवा यामध्येही कंपनीने विविध फायदे दिले आहेत. झोमॅटो गोल्डचे तीन महिने, JioSaavn Pro चे एका महिन्यासाठी मोफत सबस्क्रिप्शन, तर Netmeds वर सहा महिन्यांची पहिली सदस्यता दिली जाणार आहे. EaseMyTrip द्वारे बुक केलेल्या देशांतर्गत फ्लाईट्सवर २२२० रुपयांपर्यंत आणि हॉटेल बुकिंगवर १५ टक्क्यांपर्यंत सूटदेखील या पॅकमुळे मिळू शकते.
जिओचा हा प्लॅन डेटा व्हाउचर म्हणून सादर करण्यात आला असून तो ग्राहकांना तुलनेने कमी किमतीत मर्यादित डेटा वापरासोबत ओटीटी सबस्क्रिप्शन आणि अनेक ऑफर्स देतो. कंपनी आधीपासूनच जिओहॉटस्टार फायदे असलेले दोन आणखी प्रीपेड पॅक ₹१९५ आणि ₹९४९ किंमतीत पुरवत आहे. नवीन १०० रुपयांचा हा पॅक जिओच्या अधिकृत वेबसाइटवर आणि मायजिओ अॅपवर उपलब्ध करण्यात आला आहे.
जिओने कोणता नवीन प्लॅन लाँच केला आहे?
जिओने १०० रुपयांचा "सेलिब्रेशन अॅड-ऑन पॅक" सादर केला आहे.
या १०० रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळेल?
३० दिवसांसाठी ५ जीबी डेटा आणि जिओहॉटस्टार मोबाईल/टीव्हीचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.
या पॅकमध्ये अतिरिक्त ऑफर्स कोणत्या आहेत?
झोमॅटो गोल्ड तीन महिने, जिओसावन प्रो एका महिन्यासाठी, नेटमेड्स सहा महिने सदस्यता, अजिओवर २०० रुपये सूट, रिलायन्स डिजिटलवर डिस्काउंट्स अशा अनेक ऑफर्स आहेत.
हा प्लॅन ग्राहक कुठे खरेदी करू शकतात?
मायजिओ अॅप आणि जिओच्या अधिकृत वेबसाइटवर हा प्लॅन खरेदी करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.