jio  goggle
बिझनेस

Jio Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग, रिचार्ज अन् बरंच काही! जिओने लाँच केले दोन जबरदस्त रिचार्ज प्लान

Jio New Recharge Plan Offer: रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लान घेऊन येत असते. सध्या जिओ कंपनीने यूजर्ससाठी दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतातील जिओ कंपनी नेहमीच त्यांच्या यूजर्ससाठी नवनवीन रिचार्ज प्लान घेऊन येत असते. आतापण रिलायन्स जिओ कंपनीने त्यांच्या यूजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. जिओ कंपनी त्याच्या ठराविक वेळेनंतर अनेक रिचार्ज प्लान आणि ऑफर्स नव्याने अपडेट करत असते. यामुळे ग्राहकांना रिचार्ज प्लान,ऑफर्स आणि फीचर्स यांचा खूप मोठा फायदा मिळत असतो. रिलायन्स जिओ कंपनी यूजर्ससाठी काही कमी किमतीचे स्वस्त रिचार्ज प्लान घेऊन आली आहे. जाणून घेऊया त्या दोन रिचार्ज प्लानची किंमत.

रिलायन्स जिओ कंपनीने दिवाळीमध्ये सुद्धा ऑफर लाँच केली होती. यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा देखील झाला होता. जिओच्या अनेक रिचार्ज प्लानमुळे ग्राहकांना अनेक चांगल्या डेटा ऑफरचा फायदा घेता येतो. पण बीएसएनल कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लान लाँच केला आहे. यामुळे जिओ कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी ८९९ आणि ९९९ रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लान घेऊन आली आहे. या दोन स्वस्त रिचार्ज प्लानमुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीये. याबरोबर त्यांना या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॅालिंग आणि अनलिमिटेड डेटा यांसारखे अनेक फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊया जिओच्या या दोन रिचार्ज प्लानबद्दल.

८९९ रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओच्या ८९९ रुपयांच्या रिचार्ज प्लान ९० दिवसांसाठी मर्यादित आहे. त्याबरोबर यूजर्सना या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा प्राप्त होईल. याबरोबर यूजर्स अमार्यदित कॅालिंग, दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ घेऊ शकता. जिओ वापरकर्त्यांसाठी हा एक बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लान आहे.

९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

यूजर्ससाठी जिओचा ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान ९८ दिवसांपर्यत मर्यादित आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॅालिंग आणि फ्री १०० एसएमएसचा लाभ घेता येणार आहे. याबरोबर यूजर्सना ९९९ प्लानमध्ये JioTV आणि jioCinema चे मोफत सबस्क्रिशन देखील मिळणार आहे.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT