Naresh Goyal Google News
बिझनेस

Naresh Goyal: पत्नी कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर, उपचारासाठी पैसे नाहीत, नरेश गोयलांनी कोर्टात थरथरत जोडले हात

Naresh Goyal : शनिवारी गोयल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ही सुनावणी स्पेशल न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर झाली. त्यावेळी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घोटाळा केल्याप्रकरणी नरेश गोयलांना अटक करण्यात आली होती.

Bharat Jadhav

Naresh Goyal Break down in ED Court:

पत्नी कॅन्सर पीडित असून ती लास्ट स्टेजवर आहे, मुलगीही आजारी आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. मीही जगण्याची आशा सोडून दिलीय, असं गोयल यांनी थरथरत न्यायाधीशांसमोर जोडत सांगितलं. कॅनरा बँकेत ५३८ कोटींचा घोटळा केल्याप्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल तुरुंगात आहेत. सप्टेंबर महिन्यात घोटाळा केल्याप्रकरणी नरेश गोयलांना अटक करण्यात आली होती. (Latest News)

शनिवारी गोयल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ही सुनावणी स्पेशल न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर झाली. त्यावेळी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, सुनावणीवेळी त्यांचं बोलणं बारकाईने ऐकले. त्यांचं शरीर थरथरत होते. मी त्यांना आश्वासन दिलं की, त्यांच्या मानसीक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिलं जाईल.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नरेश गोयल हे कॅनरा बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या आर्थर रोडच्या तुरुंगात आहेत. ५३८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. गोयल यांनी जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेली ते पूर्णपणे आशाहीन झालेले दिसले. त्यांनी जगण्याची आशा सोडून दिल्याचे ते म्हणाले.

वयाच्या ११ वर्षीय त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवलं होतं. यादरम्यान त्यांचे कुटुंब कर्जात होतं. त्या कर्जामुळे वडिलोपार्जित घर त्यांना विकावं लागलं होतं. त्यानंतर नरेश यांनी आपल्या मामांकडे काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मामांची एक ट्रव्हल एजन्सी होती, त्यात ते कॅशिअर म्हणून त्यांनी काम केलं. तेथे त्यांना ३०० रुपयांचा पगार मिळत होता. दरम्यान गोयल यांनी ५ मे १९९३ ला दोन विमानांनी जेट एअरवेज कंपनी सुरू केली होती. २००६ रोजी त्यांनी ५० कोटी डॉलरमध्ये एअर सहारा खरेदी केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

SCROLL FOR NEXT