Buying Agricultural Land AI
बिझनेस

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

Documents required to buy agricultural land : शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात? व्यवहार करण्यापूर्वी सातबारा उतारा, फेरफार नोंद, जमिनीचा नकाशा, ८-अ उतारा आणि टायटल डीड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे तपासा.

Namdeo Kumbhar

how to check 7/12 online Maharashtra : आपल्याकडे शेतजमीन खरेदी करणे ही एक मोठी आणि उत्तम गुंतवणूक मानली जाते. बऱ्याचदा योग्य माहिती नसल्यामुळे किंवा घाईघाईत व्यवहार केल्यामुळे लोक फसवणुकीचे शिकार होतात. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना, आयुष्यभराची कमाई कुठेही अडकू बसते. त्यामुळेच जमीन खरेदी करताना काही कागदपत्रे तपासणे गरजेचं आहे.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतजमीन खरेदीचे नियम वेगळे असतात, शिवाय जमिनीचे टायटल डीड, सातबारा (खाता), एनओसी आणि एनकंबरन्स सर्टिफिकेट यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे तपासणे अत्यंत गरजेचे असते. शेतजमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, कोणते डॉक्युमेंट्स तपासावेत आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन कसे करावे, माहिती असणे गरजेचं आहे.

सातबारा उतारा (7/12 Extract)

सातबारा हा जमिनीचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. यावरून संबंधित जमीन नेमकी कोणाच्या नावावर आहे, जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे आणि त्यावर कोणाचे अधिकार किंवा कर्ज आहे का, हे समजते. नेहमी सध्याचा सातबारा उतारा तपासावा.

फेरफार नोंद (Mutation Entry)

जमिनीच्या मालकीहक्कामध्ये भूतकाळात काय बदल झाले आहेत (उदा. खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा बक्षीसपत्र), याची नोंद फेरफारमध्ये असते. मागील काही वर्षांतील फेरफार उतारे तपासल्यास जमिनीचा खरा मालक कोण आहे हे स्पष्ट होते.

जमिनीचा नकाशा (Land Map)

जमीन खरेदी करताना मोजणी विभाग किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळणारा अधिकृत नकाशा नक्की पहावा. प्रत्यक्षात कागदावर असलेली जमीन आणि जमिनीवर प्रत्यक्ष असणारी हद्द (बाउंड्री) एकच आहे ना, हे पाहण्यासाठी नकाशा खूप उपयोगी पडतो.

८-अ चा उतारा (Form 8-A)

या उताऱ्यावरून त्या जमिनीच्या मालकाच्या नावावर एकूण किती शेतजमीन आहे याची माहिती मिळते. तसेच, मालकावर शासनाचे किंवा इतर कोणते कर्ज किंवा देणी बाकी आहेत का, हे यावरून स्पष्ट होते.

टायटल डीड (Title Deed & Legal Search)

जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ती जमीन कायदेशीररित्या आली कशी? त्याचे मूळ मालकापासूनचे सर्व जुने दस्तऐवज (Title Deed) तपासावे. कोणताही व्यवहार अंतिम करण्यापूर्वी एखाद्या चांगल्या महसूल किंवा वकिलाकरवी (Legal Verification) कागदपत्रांची कसून पडताळणी करून घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.

कोणतीही घाई न करता, जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन तिची पाहणी करा आणि कोणत्याही दलालाच्या किंवा आमिषांना बळी न पडता कायदेशीर पूर्तता करूनच पैशांची देवाणघेवाण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Maharashtra News Live Update: सीजेपीकडून दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

Dhruv Rathee : "पोलिसांनी माझं अपहरण केलं..." 'त्या' दिवशी काय घडलं? ध्रुव राठीने सर्व सांगितलं; पाहा VIDEO

Kalyan-Latur Highway: मुंबईवरून लातूरला पोहचा फक्त ५ तासांत, तयार होतोय नवा एक्स्प्रेस वे; कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार?

SCROLL FOR NEXT