Gold Price Saam tv
बिझनेस

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

Jalgaon News : दसऱ्याच्या दिवशी अनेकजण सोनं खरेदी हमखास करत असतात. मात्र दसऱ्याच्या दोन दिवसाआधीच सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन उच्चाक गाठला आहे. तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

जळगाव : जळगावच्या सुवर्णनगरीत सोने व चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर १ लाख २० हजार ५०० इतका विक्रमावर पोहचला आहे. 

दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने- चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असते. परंतु मागील काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात मोठी तेजी असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात रोज वाढ होत असून नवा उच्चांक गाठला जात आहे. यामुळे गुंतवणुकदारांना देखील सोने- चांदीचे आभूषणे घेणे आता कठीण झाले आहे. तरी देखील सुवर्ण बाजारात खरेदीदारांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सोन चांदी दरात मोठी वाढ होत असून अमेरिकन फेडरल बँकेचे धोरण तसेच विविध देशांकडून वाढलेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे भाव यापुढेही असेच वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे सोने गुंतवणुकीकडे मोठा कल असल्याचेही ग्राहकांनी सांगितले.

एका दिवसात १५०० रुपयांची वाढ 
दरम्यान मागील २४ तासात सोन्याचा दर तब्बल १५०० रुपयांनी वाढला असून १ लाख २० हजार ५०० रुपयांवर दर पोहचला आहे. यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा विक्रमी दर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. असून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये देखील त्याच पद्धतीची वाढ झाली आहे. यापुढे देखील सोन्याचा दर सतत वाढणार असल्याच्या प्रतिक्रिया सुवर्ण व्यवसायिक यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडीच्या आक्रोश मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT