Gold Rate Prediction Saam Tv
बिझनेस

Gold Rate : सोनं आवाक्याबाहेर गेलं, ४ तासात प्रति तोळा ₹२५०० नी महागले, चांदीमध्येही विक्रमी वाढ, वाचा ताजे दर

Today gold price in India : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याने नवा विक्रम केला असून अवघ्या चार तासांत प्रति तोळा २,५०० रुपयांनी दर वाढला आहे. जीएसटीसह सोन्याचा भाव दीड लाखांच्या पार गेला.

Namdeo Kumbhar

Gold rate today in Maharashtra Jalgaon : आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतामधील गुंतवणूक अन् शेअर मार्केटवर पडत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या व्यापार धोरणामुळे जगभरातील बाजारात अस्थिरता तयार झाली. याचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर झालेला दिसतोय. जळगावच्या सुवर्णनगरी आज सोन्याने नवा विक्रम केलाय. प्रति तोळा सोन्याची किंमत तब्बल दीड लाखांच्या पार गेली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ झाली. दुपारपर्यंत सोन्याची किंमत प्रतितोळा अडीच हजारांनी वाढल्याची नोंद झाली.

सोन्याच्या दराने पुन्हा एकदा ३ हजारांच्या आसपास उसळी मारली. त्यामुळे मुंबई, पुण्यासह जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्याची स्थिती आहे. जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा दीड लाखांच्या पुढे पोहचलाय. लग्नसराई सुरू असल्याने महाराष्ट्रात सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. पण दर गगणाला भिडल्याने अनेकांनी पाठ फिरवली होती. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याची स्थिती असल्याचे जानकर सांगत आहेत.

सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली असून चार ते पाच तासांत अडीच हजारांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. सराफा बाजार उघडताच सकाळपासूनच आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण अडीच हजारांची वाढ नोंदवण्यात आली, तर चांदीच्या दरात १४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 895 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 20 हजार 330 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोन्याची किंमत आज प्रति तोळा २ हजार ५०० रूपयांनी वाढली, तर चांदीची किंमत प्रति किलो १४ हजारांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने दीड लाखांचा माईलस्टोन पार केला. सोन्याच्या दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 689 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 17 हजार 240 रुपयांवर पोहोचले आहेत. पुढील काही दिवस सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : तुमच्या संपत्तीत वाढ होणार, दिवस चांगला जणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल; असीम सरोदे यांचा दावा

Crime News: मध्यरात्र, बंद खोली आणि पतीचं वेगळंच कृत्य...; संतप्त पत्नीने पतीची जीभच कापली, नेमकं काय घडलं?

साहेब, युती तोडा! भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात राडा ; ZPचा फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

ऐन ZP निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; माजी मंत्र्याच्या मुलाची भाजपमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT