Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: वसुबारसेलाच ग्राहकांना मोठा झटका! २४ तासांत सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

Gold Rate Today: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत सोनं ७ हजारांनी तर चांदी १५ हजारांनी महागली. जाणून घ्या आजचे दर.

Shruti Vilas Kadam

Gold Rate Today: दिवाळीचा सण सुरू झाला असून वसुबारसच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ४५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या एका दिवसात झालेल्या या मोठ्या वाढीमुळे बाजारातही चर्चा सुरू झाली आहे.

२४ तासांत सोनं ७ हजारांनी महागलं

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दरवाढ मोठा धक्का आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.आज २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ४५ हजार रुपये झाला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

आजचा सोन्याचा दर (रुपयांत)

१ ग्रॅम

२४ कॅरेट सोने - १४,६०२

२२ कॅरेट सोने १३,३८५

१८ कॅरेट सोने ₹१०,९५२

८ ग्रॅम

२४ कॅरेट सोने - १,१६,८१६

२२ कॅरेट सोने - १,०७,०८०

१८ कॅरेट सोने - ८७,६१६

१० ग्रॅम

२४ कॅरेट सोने - १,४६,०२०

२२ कॅरेट सोने - १,३३,८५०

१८ कॅरेट सोने १,०९,५२०

१०० ग्रॅम

२४ कॅरेट सोने - १४,६०,२००

२२ कॅरेट सोने - १३,३८,५००

१८ कॅरेट सोने - १०,९५,२००

चांदीच्या दरात १५ हजारांची वाढ

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत चांदी तब्बल १५ हजार रुपयांनी महागली आहे. आज चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख ९५ हजार रुपये झाला आहे. चांदीचे दागिने, भांडी आणि इतर वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही या दरवाढीचा परिणाम जाणवणार आहे.

अमेरिकेतील निवडणुकीचा बाजारावर परिणाम?

अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत असल्याची चर्चा आहे. आगामी काळातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. आगामी काळात पुन्हा सोने व चांदीचे दर वाढतील अशी शक्यता सोन्या तज्ञ आकाश भंगाळे यांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

Aadhaar Update : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे झाले आता अत्यंत सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Satej Patil: वोट चोरीनंतर आता सत्ता चोरीचा प्रयत्न; गोकुळच्या वादावरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali 2026 : दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे? लालसरपणा, वेदना किंवा डोळ्यांतून पाणी येण्याकडे दुर्लक्ष करू नका

Kitchen Hacks : चाकूची धार बोथट झालीय? घरच्याघरी २ मिनिटांत करा ती धारदार, वापरा 'ही' सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT