ITR Refund  
बिझनेस

ITR फॉर्म भरल्यानंतरची एक चूक पडेल महागात, गमवाल रिफंड; जाणून घ्या नियम

ITR Refund: जर तुम्हाला आयकर परतावा मिळवायचा असेल तर बँक खात्याचे पूर्व-प्रमाणीकरण (प्री- व्हॅलिडेशन) करणं आणि ते पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे.

Bharat Jadhav

नवीन आर्थिक वर्षात तुम्ही गुंतवणुकीचा पुरावाही दिला असेल. आता आयकर रिटर्न भरण्याची वेळ आलीय. बहुतेक लोकांसाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. जर वेळेवर आयटीआर दाखल करून तुम्ही दंड, कर सूचना आणि परतफेडीत विलंब टाळू शकता. आयटीआर दाखल करणे म्हणजे फक्त एक फॉर्म भरण्याचं काम नसतं. कधीकधी छोट्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. म्हणून आयकर परतावा (आयटीआर रिटर्न) दाखल केल्यानंतर तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. यात बँक खाते सत्यापित करणे आवश्यक आहे.

आयकर रिटर्न (ITR) दाखल केल्यानंतर, जर तुम्हाला काही परतावा मिळाला तर तो तुम्हाला आयकर विभागाच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) द्वारे मिळत असतो. यामुळे आयकर परतावा दाखल केल्यानंतर, तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. यामध्ये बँक खाते सत्यापित करण्याचं काम समाविष्ट आहे.

आयकर रिटर्न (ITR) दाखल केल्यानंतर जर तुम्ही कोणत्याही परताव्यासाठी पात्र असाल, तर तुम्हाला ते आयकर विभागाच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) द्वारे मिळते. तुमचे बँक खाते (प्री-व्हॅलिडेशन) पूर्व-प्रमाणित असणे आवश्यक आहे. ज्यामुळे परतावा मिळण्यास विलंब होणार नाही. तुम्ही घरी बसून तुमचे खाते पूर्व-प्रमाणित करू शकता. प्री-व्हॅलिडेशन व्यतिरिक्त तुमचे बँक खाते परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच (पॅन) शी जोडलेले असणे देखील महत्त्वाचं आहे. जर असे झाले नाही तर परतफेड रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

बँक खाती प्री-व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया

www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या. त्यानंतर पॅन नंबर आणि पासवर्ड लॉगिन करा.

यानंतर प्रोफाइल सेटिंग्ज टॅबवर जा.

Pre-validate your bank account च्या ऑप्शनला सिलेक्ट करा.

जर तुमचे इतर कोणतेही खाते आधीच प्री-व्हॅलिडेटेड असेल तर ते स्क्रीनवर दिसेल.

जर तुम्हाला दुसऱ्या खात्यात परतावा मिळवायचा असेल, तर 'Add' वर क्लिक करा.

आता एक नवीन पेज उघडेल. यात बँक खाते क्रमांक, कोणते खाते आहे, IFSC, बँकेचे नाव, बँक शाखा, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी भरावे लागतील.

आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मोबाईल नंबर तोच द्यावा लागेल जो तुमच्या आधार आणि बँक खात्याशी लिंक केलेला असेल.

आता प्री-व्हॅलिडेट वर क्लिक करा. स्क्रीनवर सबमिट करण्याचा मेसेज दिसेल.

त्याची स्टेट्स तुम्हाला ई-मेल आणि एसएमएसद्वारे मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT