आतापर्यंत हजारो करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी जास्त उशीर करु नका, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मुदतीपूर्वी तुम्ही आयटीआर फाइल करा. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे. त्यामुळे त्याआधी तुम्ही नक्कीच आयटीआर फाइल करा.आयटीआर फाइल करताना कधीच या ७ चुका करु नका, अन्यथा तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते.
१. खोटे डिडक्शन क्लेम करु नका
कधीकधी करदाते टॅक्स कमी करण्यासाठी खोटे डिडक्शनचे दावे करतात. परंतु आता आयकर विभाग रिटर्न प्रोसेस करण्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा वापर करतात. त्यामुळे तुमचे हे खोटे क्लेम डिडक्शन लगेच पकडले जातील. त्यामुळे तुम्हाला नोटीस येऊ शकते.
२. Form 16,AIS,26AS डेटा मॅच करा
आयटीआर फाइल करण्यापूर्वी Form 16,AIS,26AS डेटा मॅच करणे खूप गरजेचे आहे. हे फॉर्म तुम्ही वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करु शकतात. यामध्ये टीडीएस, टीसीएसची माहिती दिलेली असते.
३. आयटीआर फॉर्म निवडण्यात चुक करु नका
आयटीआर फॉर्म हा प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळा असतो. नुकताच आयटीआर २ फॉर्म सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार वेगवेगळे फॉर्म भरा.
४. फक्त फॉर्म १६ गरजेचा नाही
आयटीआर फाइल करताना फॉर्म १६ असणे अनिवार्य आहे. परंतु फक्त एवढेच नाही. काही माहिती फॉर्म १६ मध्ये नसते. तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरील व्याजाची माहिती नसते. त्यामुळे तुम्हाला ही माहिती द्यावी लागणार आहे.
५. फॉरेन असेट्सबद्दल माहिती द्या
तुम्हाला तुमच्या सर्व संपत्तीची माहिती द्यायची आहे. परदेशात जर तुम्ही काही प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर त्याचीही माहिती द्यायची आहे. जर परदेशात तुमच्या बँक अकाउंटमध्ये बॅलेंस नसेल तरीही त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे.
६. मागील कंपनीमधील उत्पन्न
तुम्ही जर मागच्या वर्षी नोकरी बदलली असेल तर तुम्हाला त्या उत्पन्नाचीही माहिती द्यायची आहे.AIS मध्ये तुमच्या मागील एम्प्लॉयरकडून मिळालेल्या पगाराची माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे उत्पन्न लपवता येणार नाहीये.
७.बँक अकाउंटची खरी माहिती द्या
आयटीआर फाइल केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटची योग्य माहिती द्या. हे बँक अकाउंट वॅलिडेट करणेदेखील गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या बँक अकाउंटची माहिती दिली तर रिफंड दुसऱ्याच कोणत्या अकाउंटमध्ये जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.