ITR Filing without Form 16 
बिझनेस

ITR Filing: कंपनीकडून फॉर्म १६ नाही मिळाला? तरीही ITR दाखल करता येईल का?

ITR Filing without Form 16: तुम्हीही फॉर्म १६ मिळण्याची वाट पाहत आहात का? हो, तर तुम्ही फॉर्म १६ शिवायही आयकर रिटर्न भरू शकता.

Bharat Jadhav

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, आयकर विभागाने आयटीआर-१ ते आयटीआर-७ पर्यंतचे सर्व फॉर्म जारी केलेत. तुम्ही ई-फायलिंग पोर्टलद्वारे तुमच्या घरबसल्या आयटीआर दाखल करू शकता. यासाठी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचा तपशील आणि इतर उत्पन्नाचे पुरावे आवश्यक आहेत.

पॅन आणि आधार लिंक केल्याशिवाय आयटीआर देखील दाखल केला जात नाही. जर एखाद्या पगारदार व्यक्तीला फॉर्म १६ मिळाला नसेल, तर आयटीआर दाखल करता येईल का? फॉर्म १६ शिवाय आयटीआर अंतिम करता येईल का? तर कोणत्या प्रकरणांमध्ये तुम्ही फॉर्म १६ शिवायही आयटीआर दाखल करू शकतात, हे जाणून घेऊ.

फॉर्म १६ म्हणजे काय?

प्रत्यक्षात, फॉर्म १६ हे टीडीएस प्रमाणपत्र आहे. हा फॉर्म कंपनी कर्मचाऱ्यांना देते.जर तुमच्या पगारातून टीडीएस कापला गेला तर कंपनी तुम्हाला आयटीआर दाखल करण्यासाठी फॉर्म १६ देईल. या फॉर्ममध्ये तुमचा वार्षिक पगार, कर कपात, कलम 80C, 80D सारख्या सूट याबद्दल माहिती असते. जर तुम्हाला फॉर्म १६ मिळाला नाही तर काळजी करण्याची गरज नाहीये.

कंपनी कोणत्या पगारदार व्यक्तींना फॉर्म १६ देत नाही?

जर तुम्हाला तुमच्या कार्यालयातून फॉर्म १६ मिळाला नाही तर काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे इतर पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही आयटीआर दाखल करू शकता. प्रत्यक्षात, ज्या कर्मचाऱ्यांचा पगार कर श्रेणीत येत नाही आणि टीडीएस कापला जात नाही, अशा कर्मचाऱ्यांना कंपनी फॉर्म १६ देत नाही, असे कर्मचारी फॉर्म १६ शिवाय आयटीआर दाखल करू शकतात.

फॉर्म १६ शिवाय ITR कसा दाखल करायचा?

तुम्ही फॉर्म १६ शिवायही आयटीआर दाखल करू शकता. यासाठी फक्त काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. यापैकी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे फॉर्म २६एएस. त्यात कापलेल्या कराची संपूर्ण माहिती असते जी कर क्रेडिट स्टेटमेंट म्हणून ओळखली जाते. फॉर्म २६एएस मध्ये टीडीएस आणि टीसीएसशी संबंधित माहिती असते. इतकेच नाही तर या फॉर्ममध्ये अॅडव्हान्स टॅक्स आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांची माहिती देखील आहे.

कसे डाउनलोड करावे Form 26AS?

ई-फाईलिंग पोर्टलच्या वेबसाइटला भेट द्या.

येथे गेल्यानंतर, My Account हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

येथे तुम्हाला फॉर्म २६एएस ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर मूल्यांकन वर्ष निवडा आणि व्ह्यू टाइमवर क्लिक करा.

यानंतर फॉर्म २६एएस डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

डाउनलोड बटणावर क्लिक केल्यानंतर, फॉर्म 26AS डाउनलोड होईल.

फॉर्म २६एएस व्यतिरिक्त, हे कागदपत्रे देखील आवश्यक आहेत.

फॉर्म १६ शिवाय आयटीआर दाखल करण्यासाठी फॉर्म २६एएसच शिवाय पगार स्लिप देखील आवश्यक आहे. मार्च महिन्याची पगार स्लिप आवश्यक आहे.

याशिवाय, बँक स्टेटमेंट देखील आवश्यक आहे. गुंतवणुकीचा पुरावा आणि कर सवलत देखील आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Plastic surgery : कॅन्सरमुळे तरुणानं लिंग गमावलं, ८ वर्षांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना, साडे ९ तास चाललं ऑपरेशन

SCROLL FOR NEXT