Income Tax Saam tv
बिझनेस

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ITR Filing 2025: तुम्हीही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयटीआरच्या ई-व्हेरिफिकेशननंतर ४-५ आठवड्यांच्या आत रिफंड तुमच्या बँक खात्यात पाठवण्यात येत असतो.

Bharat Jadhav

जेव्हा तुम्ही सरकारला भरलेला कर तुमच्या प्रत्यक्ष कर देयतेपेक्षा जास्त असेल तेव्हा आयकर परतावा मिळत असतो. तुमच्या उत्पन्नातून जास्त टीडीएस कापला जातो किंवा तुम्ही जास्त आगाऊ कर भरला असतो तेव्हा असे घडते. रिटर्न भरताना तुम्ही या अतिरिक्त कराचा परतावा मागू शकता.

आयटीआरच्या ई-व्हेरिफिकेशननंतर ४-५ आठवड्यांच्या आत तुमच्या बँक खात्यात परतावा जमा होतो. पण लक्षात ठेवा, फक्त आयटीआर दाखल करून तुम्हाला पैसे मिळत नाहीत. यासाठी काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतात.

जेव्हा करदात्याने त्याच्या प्रत्यक्ष कर दायित्वापेक्षा जास्त कर भरला असेल तेव्हाच आयकर विभाग परतावा जारी करतो. म्हणजेच, जर तुम्ही मोजणीपेक्षा जास्त कर भरला असेल, तर सरकार तुम्हाला ते अतिरिक्त पैसे परत करेल. कधीकधी हा परतावा व्याजासह येत असतो. पेमेंटच्या तारखेपासून परतावा जारी होईपर्यंत दरमहा ०.५% (म्हणजेच वार्षिक ६%) दराने येत असतो.

यासाठी तुमचे बँक खाते आयकर पोर्टलवर जोडलेले आणि सक्रिय असले पाहिजे. जर बँक खाते बंद केले असेल, निष्क्रिय केले असेल किंवा पोर्टलवर अपडेट केले नसेल, तर परतफेड रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून, योग्य बँक खाते जोडणे आणि पडताळणे महत्वाचे असते.

बँक खाते कसे जोडायचे?

सर्वप्रथम [ई-फाईलिंग पोर्टल] (https://www.incometax.gov.in) वर लॉगिन करा.

आता My Profile सेक्शन मध्ये जा.

तिथे My Bank Account वर क्लिक करा.

Add Bank Account पर्याय निवडा आणि नवी पेज ओपन होईल. तेथे बँकेचा तपशील टाका, जसे की, अकाऊंट नंबर, अकाऊंट प्रकार, होल्डर टाइप आणि IFSC कोड

सर्व माहिती भरल्यानंतर Validate वर क्लिक करा.

जर पडताळणी यशस्वी झाली, तर तुमचे तपशील आणि पुष्टीकरण संदेश स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालेगाव संगमेश्वर येथे शैक्षणिक साहित्यातून साकारली 18 फुटी गणरायाची मूर्ती

Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार चढ-उतार; भुतकाळामुळे वाद होण्याची शक्यता

Hindu Wedding Traditions: दिवसा की रात्री? लग्न करण्यासाठी योग्य वेळ कोणती? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Mhada 2025 : खूशखबर! मुंबई, नाशिकमध्ये म्हाडाची ६०० हून अधिक घरे उपलब्ध होणार; अर्ज कधी अन् कुठे करायचा? जाणून घ्या

Train Full Form: ट्रेनने रोजच प्रवास करताय? पण तुम्हाला ट्रेनचा फुलफॉर्म माहितीये का?

SCROLL FOR NEXT