ITC Hotels : आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स सेन्सेक्स आणि बीएसईच्या इतर निर्देशांकांवरुन काढून टाकण्यात आले आहेत. आयटीसी समूहातून आयटीसी हॉटेल्स बाहेर पडल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. पॅसिव्ह फंड पोर्टफोलिओमध्ये बॅलेन्स करण्यासाठी सुरुवातीला हे शेअर्स तात्पुरत्या स्वरुपामध्ये या इंडेक्समध्ये सामील करण्यात आले होते. आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स इंडेक्समधून काढण्यामागील प्रमुख कारण बीएसईने स्पष्ट केले आहे.
आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स सेन्सेक्स आणि निफ्टीमधून का काढण्यात आले?
बीएसईच्या अनुसार, आयटीसी हॉटेल्सचे शेअर्सच्या वेगळ्या ट्रेडिंगची सुरुवात २९ जानेवारीपासून सुरु झाली होती. कटऑफ वेळमर्यादेपर्यंत आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सने लोअर सर्किटला स्पर्श न केल्याने बुधवारी (५ जानेवारी) ट्रेडिंग सुरु होण्यापूर्वी कंपनीला सर्व बीएसई निर्देशांकांमधून काढून टाकण्यात आले.
२९ जानेवारी रोजी आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स बीएसई लिस्टिंग प्राइज १८८ रुपये प्रति शेअर आणि एनएसई लिस्टिंग प्राइज १८० रुपयांवर लिस्ट झाले होते. मंगळवारी ४ फेब्रुवारी हॉटेल्सचे शेअर १६५ रुपयांवर गेल्याने ४.२ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले. एनएसई निफ्टीमधून आयटीसी हॉटेल्स काढून टाकल्यानंतर ७०० कोटी रुपयांची आणखी विक्री होऊ शकते.
या निर्णयाचा परिणाम बीएसई १००, बीएसई २००, बीएसई ५०० आणि बीएसई फास्ट मूव्हिंग कंज्यूमर गुड्स आणि बीएसई इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स यांसारख्या अनेक निर्देशांकांवर झाला. याव्यतिरिक्त बीएसई ऑलकॅप, बीएसई लार्जकॅप, बीएसई डिविंडेंड स्टेबिलिटी इंडेक्स आणि बीएसई लो वॉलॅटिलिटी इंडेक्स यांसारख्या विस्तृत इंडेक्सवरही याचा परिणाम झाला आहे. यामुळे इंडेक्स ट्रॅकर्सना तब्बल ४०० कोटी रुपयांचे शेअर्स विकावे लागले. एनएसई निफ्टीवरुन डिलिस्टिंग केल्यानंतर, ७०० कोटी रुपयांची विक्री देखील होऊ शकते.
आयटीसी समूहाने आयटीसी हॉटेल्स एका नव्या संस्थेमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शेअरधारकांसाठी वॅल्यू अनलॉक करण्याच्या उद्देशाने हॉटेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी ६ जानेवारी २०२५ रोजी एनएसई आणि बीएसईने आयटीसीच्या शेअर्सची किंमत ठरवण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.