रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता देशातील भाविकांना ७ ज्योतिर्लिगांचे दर्शन घेण्यात येणार आहे. या भाविशांसाठी एक विशेष ट्रेन दिली जाणार आहे. रेल्वे आयआरसीटीसीअंतर्गत ही रेल्वे सेवा दिली जाणार आहे. या ज्योतिर्लिगांचे दर्शन घेण्यासाठी विशेष भारत गौरव पर्टन ट्रेन दिली जाणार आहे.
आता भाविकांचे ज्योतिर्लिंगाचे दर्शन अगदी आरामदायी होणार आहे. ही यात्रा १८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ११ रात्री आणि १२ दिवसांचा हा प्रवास असणार आहे.
७ ज्योतिर्लिंगाचे दर्शन
ही विशेष ट्रेन ऋषिकेश येथून निघणार आहे. त्यानंतर पुढे हरिद्वार, मुरादाबाद, बरेल, शाहजहांपूर, हरदोई, लखनऊ, कानपूर, ओरई, झाशी, ललितपूर या ठिकाणी थांबणार आहे. या ठिकाणचे प्रवासी या ट्रेनने पुढील प्रवास करु शकतात.
या पॅकेजमध्ये उज्जैनमधील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर, सोमनाथ, नागेश्वर, द्वारकादीश आणि गुजरातमधील द्वारका त्यानंतर त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, नाशिमधील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. या ठिकाणी ट्रेन थांबणार आहे.
सुविधा
या ट्रेनमध्ये एकूण ७६७ भर्थ आहेत. या ट्रेनमध्ये 2AC,3AC आणि स्लीपर क्लासची राहण्याची सोय असणार आहे. प्रवासादरम्यान नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळणार आहे. बसने स्थानिक पर्यटन स्थळे पाहण्याची आणि हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.
ट्रीपचे भाडे
स्लीपर कोचसाठी प्रति व्यक्तीसाठी भाडे २४,१०० रुपये असणार आहे. मुलांसाठी (५-११ वर्षे) भाडे २२,७२० रुपये असणार आहे. 3AC साठी प्रति व्यक्ती भाडे ४०,८९० रुपये असेल. मुलांसाठी ३९,२६० रुपये भाडे असणार आहे. कम्फर्ट क्लास 2AC साठी भाडे प्रति व्यक्ती ५४,३९० रुपये भाडे असणार आहे. मुलांसाठी ५२,४२५ रुपये भाडे असणार आहे.
बुकिंग कसे करावे?
या प्रवासासाठी तुम्हाला आधी बुकिंग करायचे आहे. तुम्हाला आयआरसीटीसी कार्यालयात किंवा www.irctctourism.com वेबसाइटवर जाऊन बुकिंग करता येणार आहे. यासाठी ईएमआयचा ऑप्शनदेखील उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.