Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लेकीला खाकी वर्दीत पाहायचं स्वप्न, दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; वडिलांसाठी पूजा अवाना झाल्या IPS

Success Story of IPS Pooja Awana: आयपीएस पूजा अवाना यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पूजा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली होती.

Siddhi Hande

आयपीएस पूजा अवाना यांचा प्रवास

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाल्या IPS अधिकारी

दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश

यूपीएससी (UPSC) परीक्षा पास करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. असंच काहीसं पूजा अवाना यांनी केलं. त्या आज आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूजा अवाना यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

आयपीएस पूजा अवाना (IPS Pooja Awana) या मूळच्या नोएडाच्या रहिवासी आहेत. त्या नेहमीच परीक्षेत अव्वल होत्या. शाळेत नेहमी टॉप करायच्या. त्यांनी लहानपणीच प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे ठरवले होते. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की, लेकीला पोलिसाच्या वर्दीत पाहायचं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूजा या आयपीएस अधिकारी झाल्या.

पूजा अवाना यांनादेखील अपयशाचा सामना करावा लागला. अपयशामुळे किंवा कमी गुण मिळाल्याने निराश होऊ नका. आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करा. एकदा नाही तर दुसऱ्यांदा नक्कीच यश मिळेल, असं पूजा सांगतात. त्यामुळेच अपयशाला कधीच घाबरु नका.

पूजा यांनादेखील पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. परंतु पहिल्यांदा अपयश मिळाल्याने पूजा यांनी हिम्मत सोडली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात ३१६ रँक प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास खूपच खडतर होता. त्या २०१२ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

पूजा यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की, तुम्ही तुमची ताकद आणि कमजोरी काय आहे ते शोधा. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार विषय निवडा. यानंतर अभ्यास करायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Accident : पनवेल रेल्वे स्टेशनवर बसचा ब्रेक फेल, चालकामुळे मोठी दुर्घटना टळली, थरराक व्हिडिओ

Teacher ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटका

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT