Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मुलाच्या जन्मानंतर केली UPSCची तयारी; चौथ्या प्रयत्नात झाल्या IPS; नित्या राधाकृष्णन यांचा प्रवास

Success Story of IPS Nithya Radhaksrishnan: नित्या राधाकृष्णन या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. त्यांनी मूल झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Siddhi Hande

IPS नित्या राधाकृष्णन यांचा प्रेरणादायी प्रवास

मुल झाल्यानंतर सुरु केली यूपीएससी परीक्षेची तयारी

सलग तीनदा अपयश तरी खचल्या नाही

इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. जर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल आणि मेहनत करायची ताकद असेल तर तुम्ही यश हे मिळवतात. असंच काहीसं नित्या राधाकृष्णन यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना चौथ्या प्रयत्नात यश मिळाले.

नित्या राधाकृष्णन यांनी तमिळनाडूतील लहानश्या गावातील रहिवासी. त्यांनी एका मुलाच्या जन्मानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पदरात एक मुल असताना पूर्ण वेळा अभ्यास करायला जमत नाही. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले.

यूपीएससी परीक्षा देण्याच्या मार्गात त्यांना अनेक अडथळे आले. परंतु तरीही त्या डगमगल्या नाही. एकदा, दोनदा नव्हे तर सलग तीनदा त्यांना अपयश मिळाले.त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

नित्या राधाकृष्णन यांनी वेल्लोर प्रोद्योगिकी संस्थान वीआयटीमधून इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीत ४ वर्षे कामदेखील केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्धार केला.

२०१९ मध्ये सुरु केली तयारी

आयपीएस नित्या राधाकृष्णन यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले त्यानंतर एक मुलदेखील झाले. परंतु यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. त्याचेच यश त्यांना मिळाले.

यशात पतीचा मोठा वाटा

जेव्हा सलग तीनदा अपयश आले तेव्हा त्या खूप खचल्या होत्या. त्यांना यूपीएससी परीक्षेची तयारी सोडण्याचा विचार मनात आला होता. परंतु या परिस्थितीत त्यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळेच त्यांनी पुन्हा तयारी केली आणि यश मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT