Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: वडिलांच्या वर्दीकडे पाहून प्रेरणा मिळाली, थेट आयएपीस झाला; अभिनव शर्मा यांचा यशस्वी प्रवास

Success Story of IPS Abhinav Sharma: आयपीएस अभिनव शर्मा यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी अभ्यासासाठी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

IPS अभिनव शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC

परीक्षेसाठी सोशल मीडियापासून राहिले दूर

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दरवर्षी लाखो तरुण परीक्षेला बसतात. त्यातील अनेकांना अपयश मिळते. परंतु कितीही अपयश मिळाले तरीही हार मानायची नसते. असंच काहीसं आयपीएस अभिनव शर्मा यांनी केलं.

अभिनव शर्मा यांनी यूपीएससी परीक्षेत १३०वी रँक प्राप्त केली. त्यांनी आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचे वडील हे पोलिस इन्स्पेक्टर आहेत तर काका पोलिस कॉन्स्टेबल आहेत.

अभिनव यांचे वडील रमेश चंद्र शर्मा हे पोलिस आहेत. वडिलांना वर्दीत पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा. याच वर्दीकडे पाहून त्यांनी यूपीएससी परीक्षेचं स्वप्न पाहिले आणि पूर्णदेखील केले. त्यांनी २०२० मध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेता घेता यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

यूपीएससी आधी अभिनव शर्मा यांनी JEE परीक्षा पास केली. इंजिनियरिंगसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. २०२० मध्ये त्यांनी आयआयटी पाटणा येथून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात ते प्रिलियम्स परीक्षादेखील पास कली नाही. ते दुसऱ्या प्रयत्नात इंटरव्हूयपर्यंत पोहचले परंतु त्यांना यश मिळाले नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांची निवड पोस्टल सर्व्हिसमध्ये झाली. परंतु ते समाधानी नव्हते. शेवटी २०२४ मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आणि ते आयपीएस झाले.

सोशल मीडियापासून दूर

कोरोनाच्या काळात अभिनव यांनी खूप अभ्यास केला. या काळात ते मनाने खूप खचले होते. त्यामुळे त्यांनी अभ्यासासाठी सोशल मीडियापासून दूर राहायला निर्णय घेतला. अभ्यास करताना त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...

White Hair Home Remedies: पांढऱ्या केसांना वैतागलात? मग 5 सोपे घरगुती उपाय करा, केस होतील काळेभोर

Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...; विहिरीत फेकण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग

T20 World Cup Final आधी न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT