iPhone 16 Pro Saam Tv
बिझनेस

iPhone 16 Pro मध्ये काय असणार खास? लाँच होण्यापूर्वीच फोटो झाले लीक

Siddhi Hande

अॅपल कंपनीचा iPhone 16 लवकरच लाँच होणार आहे. कंपनी सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु १० सप्टेंबरपर्यंत हा आयफोन लाँच होऊ शकतात.या iPhone 16 चा फोटो लीक झाला आहे.

मागील आठवड्यात iPhone 16 सीरीजचे फीचर्स समोर आला आहे. यामध्ये फोनबाबत काही माहिती समोर आली आहे.यामध्ये आयफोनच्या कलर ऑप्शनबद्दल माहिती समोर आली आहे.

iPhone 16 Pro मध्ये ब्लॅक, व्हाईट, गोल्ड आणि ग्रे किंवा टायटेनियम कलर ऑप्शन मिळणार आहेत. लीक झालेल्या फोटोंमध्ये नवीन स्मार्टफोन iPhone 15 Pro सारखा दिसत आहे. कंपनीने मागील स्मार्टफोनमधील ब्लू टायटेनियम शेडला गोल्ड कलरने रिप्लेस केले असल्याचे दिसत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro मध्ये A18 Pro चिप दिली जाऊ शकते. त्यात 6.1 इंच किंवा 6.7 इंचचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 3577mAh बॅटरी दिली जाऊ शकते. याचसोबत 40Wची फास्ट चार्जिंग आणि 20W वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. या नवीन स्मार्टफोनची किंमत iPhone 15 आणि iPhone 15 Pro पेक्षा १० टक्के जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT