Income Tax Saving Saam Tv
बिझनेस

Income Tax: नोकरदार 'या' पद्धतीने वाचवू शकतील टॅक्स; रिटर्न भरण्याआधी कसा मिळेल लाभ? जाणून घ्या

Bharat Jadhav

नोकरदार वर्गासाठी कर वाचवणं हे एक आव्हानाचं काम असतं. अनेकवेळा करदाते इनकम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अंतिम दिवसात कर वाचवण्याचा विचार करतात. परंतु तुम्ही जर आधीच नियोजन करू ठेवलं तर तुम्ही जास्त पैसा वाचवू शकाल.

कर सेव्हिंगसाठी सरकारकडून अनेक संधी दिल्या जातात. आयकर अधिनियम 80C च्या अंतर्गत कशाप्रकारे 1.5 लाख रुपयांचा कर वाचवू शकतो, हे जाणून घेऊ. इनकम टॅक्सच्या अॅक्टनुसार 80C च्या अंतर्गत कर कपातीपासून लाभ मिळतो. आज आपण असेच अनेक पर्याय जाणून घेणार आहोत, ज्यातून आपण कर वाचू शकणार आहोत.

एफडी

जर तुम्ही ५ वर्ष मर्यादा असलेल्या एफडीमध्ये गुतंवणूक केली असेल तर तुम्ही 1.5 लाख रुपायांच्या कर कपातीपासून वाचू शकतात. सध्या एफडीवर 7 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. परंतु एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर कर लागते. एफडीवर आयकर अधिनियम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.

पीपीएफ

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही तुम्हाला करातून लाभ मिळत असतो. पीपीएफमध्ये 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते. तसेच दर तीन महिन्यांनी पीपीएफमधील व्याजदर बदलत असतात. विशेष म्हणजे या व्याजावर कोणताच कर लागत नाही.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीममध्येही गुंतवणूक करणं हा एक पर्याय आहे. यातही तीन वर्षांचा कालावधी लॉक करायचा असतो. यात कॅपिटल गेन्स टॅक्स लागत असतो. दरम्यान एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपये रिडेम्पशन कराची सूट असते. एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 10 टक्के कर या हिशोबाने कर लावला जातो.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 5 वर्षापर्यंत एक निश्चित केलेलं व्याज दिलं जातं. सध्या वर्षाला 6.8 टक्के व्याज मिळत असतं. जर तुम्हाला कोणती जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकतात. यात तुम्ही एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत करात सूट मिळवू शकतात. तसेच आयुर्विमा पॉलिसीसह तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

नॅशनल पेन्शन सिस्टीम

नॅशनल पेन्शन सिस्टीम एक गुंतणवुकीसाठी उत्तम पर्याय आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही करात सवलत मिळवू शकतात. यात तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकतात. तर 80CCD (1B) च्या अतंर्गत 50,000 रुपयांचा अतिरिक्त करात देखील तुम्ही सवलत मिळवू शकतात.

ट्यूशन फी

जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी भरत असला तर त्यातूनही करात सवलत मिळवू शकतात. तुम्ही 80C च्या अंतर्गत करातून सूट मिळवू शकतात.

कर्मचारी भविष्यनिधी

कर्मचारी भविष्य निधीमधूनही टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळवू शकतात. 80Cच्या अंतर्गत तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात.

सिनिअर सिटीजन स्कीम

सिनिअर सिटीजन सेव्हिंग्स स्कीममधूनही करात सवलत मिळवता येते. ही स्कीम 5 वर्षांपर्यच्या कालावधीसाठी असते. यात स्कीमचा लाभ 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना

ही योजना सुकन्या समृद्धी योजना सरकारने सुरू केलीय. या योजनेतून आपल्याला परतावा देखील मिळतो तसेच करातून सूट देखील मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

SCROLL FOR NEXT