ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उच्च शिक्षण घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु उच्च शिक्षणासाठी कोर्सची फी खूप जास्त असते.
अनेकांना मेडिकल, इंजिनियरिंगचा अभ्यास करायचा असतो. परंतु कॉलेजची फी भरण्यासाठी आवश्यक पैसे नसतात. यावेळी एज्युकेशन लोन घेणे हा खूप चांगला पर्याय आहे.
देशातील अनेक बँका विद्यार्थ्यांना कमी व्याजदरावर एज्युकेशन लोन देतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणती बँक एज्युकेशन लोनवर किती व्याजर घेते.
युनियन बँक ८.१ टक्के व्याजदरावर एज्युकेशन लोन देते.
SBI होम लोनवर विद्यार्थ्यांना ८.१५ टक्के व्याजदर द्यावे लागते. बँक ऑफ बडोदा बँकेचेही व्याजदर सारखेच आहे.
पंजाब नॅशनल बँक विद्यार्थ्यांना ८.२ टक्के व्याजदर घेत आहे.
कॅनरा बँक एज्युकेशन लोनवर ८.६० टक्के व्याजदर ऑफर करते.
आयसीआयसीआय बँक १०.२५ टक्के व्याजदर तर अॅक्सिस बँत २० लाखांच्या लोनवर ७ वर्षांच्या कालावधीसाठी १३.७० टक्के व्याजदर घेते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधा.