प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंड, एफडी अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर एका ठरावीक काळानंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळते. यामुळे तुमचे भविष्य सुखात जाते. सरकारची अशीच एक योजना म्हणजे पीपीएफ योजना.
पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे. सध्या या योजनेत ७.१० टक्के व्याजदर मिळते. हे व्याजदर बदलत असते. (PPF Scheme)
सरकारच्या पीपीएफ योजनेत तु्म्ही रोज १०० रुपये गुंतवून १० लाख रुपये जमा करु शकतात. सरकारच्या पीपीएफ योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. तुम्हाला या योजनेत पैसे मिळतात. या योजनेत अकाउंट १५ वर्षांची मॅच्युअर होते. याचसोबत अनेक फायदेदेखील आहेत.
या योजनेत चक्रवाढ व्याजदेखील मिळते. त्यामुळे योजनेतील व्याजाची रक्कम वाढते. पीपीएफ योजनेत तुम्ही फक्त ५०० रुपये वर्षाला भरुन गुंतवणूक करु शकतात. या योजनेत एका वर्षासाठी जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेत ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. (Public Provident Fund)
जर या योजनेत तुम्ही १०० रुपये रोज बचत केली तर १० लाख रुपये मिळू शकतात. तुम्ही रोज १०० रुपये गुंतवले तर महिन्याला ३००० रुपये गुंतवू शकतात. म्हणजेच वर्षाला तुम्ही ३६,००० रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. म्हणजेच तुम्हाला ९.७४,३७० रुपये मिळणार आहे. यामध्ये तुमची गुंतवणूक ५.४० लाखांची असेल. तर व्याज ४,३६,३७० रुपये असेल.
या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही डबल रिटर्न मिळवू शकतात. जर तुम्ही २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला १५,९७,९८९ रुपये मिळणार आहे. यातील व्याज ८,७७,९८९ असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.