Inspirational Story Saam Tv
बिझनेस

Inspirational Story: लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, २७ लाखांचं लोन डोक्यावर; जेवणासाठी उपासमारी; पण जिद्द सोडली नाही, क्रॅक केली NEET

Inspirational Story Of Prerna Singh: लहानपणीचं वडिलांचे निधन झाले. घरावर २७ लाखांचे लोन होते. दोन वेळच्या जेवणासाठीही उपासमारी होत होती. तरीही प्रेरणी सिंग हिने जिद्दीने NEET परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर नेहमी मात करायची असते. खडतर परिस्थितीवर मात करुन जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. असंच काहीसं राजस्थानच्या कोटा येथील प्रेरणा सिंगसोबत झालं. प्रेरणा सिंग यांनी खूप बिकट परिस्थितीतून मार्ग काढत नीट परीक्षा क्रॅक केली आहे. (Prerna Singh Crack NEET Exam)

प्रेरणा सिंग यांच्या वडिलांचे खूप कमी वयात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली.प्रेरणाच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या डोक्यावर २७ लाख लोन होते.२७ लाखांचे कर्ज फेडणे हे खूप मोठं काम होतं.परंतु त्यांनी यातून मार्ग काढला.

प्रेरणाच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना दोन वेळेचे जेवणदेखील मिळत नव्हते. त्यांनी चटणी आणि भाकर खाऊन जीवन काढले आहे. एवढ्या बिकट परिस्थितीतदेखील प्रेरणा यांनी अभ्यास केला. त्यांनी नीट (NEET) परिक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांना ६८६ गुण मिळाले. (Success Story Of Prerna singh)

मीडिया रिपोर्टनुसार, प्रेरणा दहावीत असताना तिच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या घरात कोणीही कमावते नव्हते. त्यानंतर तिच्या आईने काम करण्यास सुरुवात केली. या कठीण काळात त्यांच्या नातेवाईकांनी मदत केली. प्रेरणाच्या आईने तिच्या क्लासेससाठी पैसे जमा केले. प्रेरणाने क्लासेसशिवाय १२-१२ तास अभ्यास केला.

प्रेरणाच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी दोन लाखांचे लोन घेतले. परंतु हे लोन गृहकर्जासाठी घेतले होते. परंतु ते शिक्षणासाठी वापरले त्यामुळे त्यांच्यावर बँकेने केसदेखील केली होती. प्रेरणाचे तिन्ही भावंडं खूप हुशार आहेत. त्यातील मोठी बहीण बी.एड करत आहे. तर भाऊ बी.एससी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT