Inheritance Debt Rules after Death saam tv
बिझनेस

Inheritance Debt Rules: बापानं केलेलं कर्ज मुलाला फेडावं लागतं? वडिलांच्या मृत्यूनंतर कर्जाची जबाबदारी कोणाची?

Inheritance Debt Rules after Death: पालकांच्या नावावर कोणतेही कर्ज असलं आणि त्यांचा मृत्यू झाला तर थकले फेडण्याची जबाबदारी मुलांवर येत असते. परंतु भारतीय कायद्यानुसार, मुलांवर पालकांचे कर्ज फेडण्याची वैयक्तिक जबाबदारी नसते.

Bharat Jadhav

जर एखाद्या व्यक्तीनं कर्ज घेतलं असेल आणि त्याचे निधन झाले तर ते घेतलेल्या कर्जाचे काय होते, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? मुलांना पालकांनी घेतलेले कर्ज फेडावे लागते का? जर ते कर्ज फेडले नाही तर तुमची मालमत्ता धोक्यात येऊ शकते का? देशात याबाबत काय कायदा आहे? याबाबत जाणून घेऊ.

..तर कर्ज भरायची गरज नाही

भारतीय कायद्यानुसार, सह-स्वाक्षरी केली नसेल. कर्जासाठी जामीनदार म्हणून हमी भरली नसेल तर मुलांवर पालकांनी घेतलेली कर्ज फेडण्याची कोणतीही वैयक्तिक जबाबदारी नसते. म्हणजेच, फक्त मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून कर्ज फेडण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन नसते.

पण जर मृत व्यक्तीनं कोणती मालमत्ता, पैसा किंवा इतर मालमत्ता मागे सोडली असेल तर परिस्थिती आणि नियम बदलण्याची शक्यता असते. त्यावेळी कायद्यानुसार मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून थकीत रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. मालमत्ता वारसांमध्ये विभागण्यापूर्वी थकीत रक्कम वसूल करू शकतात.

पैसे वसूल करण्याचा अधिकार नाही

जर मृत व्यक्तीने १ लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि मालमत्तेची किंमत २ लाख रुपये असेल तर त्या मालमत्तेतून कर्जाची परतफेड केली जाते. पण जर मालमत्तेची किंमत कर्जापेक्षा कमी असेल, म्हणजे १ लाख रुपयांपेक्षा कमी असेन तर, कर्जदार सहसा उर्वरित रक्कम माफ करत असतो. कारण कर्ज देणाऱ्या संस्थेला मुलांकडून ती रक्कम वसूल करण्याचा अधिकार नसतो.

वैयक्तिक, शैक्षणिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे कर्ज असेल तर यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवली जात नाही. कर्जदार केवळ मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून कर्ज वसूल करू शकतो. ही मालमत्ता बँक खाती, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, दागिने किंवा घर यासारख्या गोष्टी असू शकतात. मालमत्तेचे मूल्य कर्जाची पूर्तता करण्यासाठी पुरेसे असेल तर कर्ज परत केले जात असते. पण जर कोणतीही मालमत्ता नसेल किंवा मूल्य कमी असेल तर वारसाला स्वतःच्या पैशातून कर्ज परत करण्याची गरज नसते.

गृहकर्ज किंवा कार कर्जाबाबत परिस्थिती थोडी वेगळी असते. ही कर्जे घर किंवा कारसारख्या मालमत्तेवर घेतली जातात. कर्जदाराचा मृत्यू झाला आणि कर्ज फेड करणं बाकी असेल तर मालमत्ता विकून किंवा जप्त करून पैसे वसूल केली जाऊ शकतात. पण वारसाला मालमत्ता ठेवायची असेल तर त्यांना कर्ज त्यांच्या नावावर हस्तांतरित करावे लागते आणि उर्वरित रक्कम भरावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT