infinix smart 8 plus SAAM TV
बिझनेस

Infinix Smart 8 Plus : 6000mAh बॅटरी, 128 GB स्टोरेजसह जबरदस्त फिचर्स; या कंपनीने बाजारात आणला सर्वात स्वस्त स्मार्टफोन

Smartphone Features : आता तुम्ही कमी किंमतीत 6000mAh बॅटरीसह स्मार्टफोन खरेदी करू शकता. Infinix Smart 8 Plus ची कॅमेरा क्वालिटी देखील उत्तम आहे. या स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स जाणून घ्या.

Shreya Maskar

आजच्या युगात फोन ही आपली गरज बनली आहे. मोबाईल शिवाय काम करण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. पण सध्या वाढत्या महागाईमुळे मोबाईच्या किंमतीही वाढत जात आहेत. अशात कमी किंमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन खरेदी करणे खूप कठीण जाते. मात्र आता याचे टेन्शन विसरा.

तुम्हाला कमी किंमतीत भन्नाट फीचर्स असलेला फोन बाजारात आला आहे. या स्मार्टफोनचे (Smartphone) नाव Infinix Smart 8 Plus हे आहे. कमी पैशांत चांगल्या क्वालिटी आणि रंगांमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये ब्लॅक, शायनी गोल्ड, गॅलेक्सी व्हाइट कलर उपलब्ध आहेत.

प्रोसेसर

Infinix Smart 8 Plus फोन mediatek helio G36 चिपसेट, Mali-G57 MC1 जीपीयू आणि Octa-core सीपीयू सह उपलब्ध आहे.

डिस्प्ले

Infinix Smart 8 Plus फोनचा डिस्प्ले आकर्षक आहे. 6.6 इंच, 720*1612 पिक्सेल रिझोल्युशन, 60/90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 60/90Hz LCD स्क्रीनसह येतो.

रॅम

या स्मार्टफोनचा रॅम (Ram) 4GB ते LPDDR4X 8GB पर्यंत आहे. तसेच हा फोन 64GB/128GB स्टोरेजसह येतो.

कॅमेरा

Infinix Smart 8 Plus फोन 50MP+ AI LENS रिअर कॅमेरा सह येतो. सेल्फीसाठी फोनला 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

Infinix Smart 8 Plus या स्मार्टफोनला पावरफुल बॅटरी (Battery) आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरीसह येतो.

Infinix Smart 8 Plus ची किंमत काय?

Infinix Smart 8 Plus ची 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी 7790 रुपये ऐवढी किंमत आहे. तसेच ऑनलाइन खरेदी केल्यास पैशांत अजून सूट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT