Stock Market
Stock Market Yandex
बिझनेस

Stock Market Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी, मिडकॅप इंडेक्स ४९ हजार पार

Vishal Gangurde

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी दिसली. आज सोमवारी कच्च्या तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे आज एफएमसीजी आणि कंज्यूमर ड्यूरेबल्स स्टॉक्समध्ये अधिक तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजारात निफ्टीच्या मिडकॅपम इंडेक्सचा आकडा ४९००० पार पोहोचला आहे. आजच्या दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ५६० अंकाने उसळी घेत ७३,६४८ वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी १९० अंकानी उसळी घेत २२,३३६ अंकावर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानंतर तेजी पाहायला मिळाली. यामुळे मार्केट कॅपिलायजेशन देखील वाढलं आहे. बीएसईवर लिस्टेड स्टॉक्स हा मार्केट कॅप 397.86 लाख कोटी रुपयांवर बंद झाला. मागच्या आठवड्यात मार्केट कॅपिलायजेशन हे ३९३.४७ लाख कोटी रुपयांवर होतं. तर आजच्या व्यवहारामुळे मार्केट कॅपमध्ये ४.३९ लाख कोटींची उसळी पाहायला मिळाली.

बाजारात कंज्यूमर ड्यरेबल्स स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर कंज्यूमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये एकून २.४० टक्क्यांनी तेजी पाहयाला मिळाली. त्याचबरोबर एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी, फार्मा, बँकिग सेक्टरमध्ये तेजी दिसली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्येही खरेदी वाढल्याने दोन्ही स्टॉक्सच्या इंडेक्स्मध्ये तेजी दिसून आली. निफ्टीच्या ५० शेअरपैकी ४४ शेअरमध्ये तेजी दिसली, तर ६ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर सेन्सेक्सच्या ३० शेअरच्या २७ शेअरमध्ये तेजी तर ३ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT