Indian Railways Group Ticket Booking Rules  meta ai
बिझनेस

Indian Railways Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगचा नियम बदलला, वाचा संपूर्ण प्रोसेस

Indian Railways Group Ticket Booking Rules : रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी समोर आलीयेय आता रेल्वेने ग्रुप आणि बल्क तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा मोठ्या ग्रपसोबत प्रवास करणाऱ्यांना एकाच वेळी अनेक रेल्वे तिकिटं बुक करणं सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेच्या विभागाने ग्रुप आणि बल्क तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ, तीर्थयात्रा, शैक्षणिक सहली आणि विविध कार्यक्रमांसाठी एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्रुप तिकीट बुकिंगचा महत्त्वाचा नियम बदलला

नवीन नियमांनुसार, ग्रुप रिझर्व्हेशनमध्ये एकाच वेळी बुक करता येणाऱ्या बर्थच्या संख्येवरची निश्चित कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे. यापूर्वी मोठ्या समूहासाठी तिकिटे बुक करताना संख्येची मर्यादा अडचणीची ठरत होती. मात्र, आता संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या मंजुरीने आवश्यकतेनुसार मोठ्या संख्येने तिकिटे बुक करता येऊ शकतील.

कोणत्या प्रवाशांना जास्त फायदा होणार?

  • लग्नसमारंभ किंवा बारातीत सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांना.

  • तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या मोठ्या समूहांना.

  • शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींना.

  • क्रीडा स्पर्धांसाठी प्रवास करणाऱ्या संघांना.

  • सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या कलाकारांना.

रेल्वेने केलेले ५ मोठे बदल

  1. बल्क बुकिंगसाठी बर्थ संख्येची कमाल मर्यादा हटवण्यात आलीये

  2. लग्न तीर्थयात्रेसाठी मोठे ग्रुप एकत्र तिकीट काढू शकतील.

  3. CRS आणि SM यांना ग्रुप बुकिंग मंजुरीचा अधिकार असेल.

  4. सर्व श्रेणींसह RAC आणि वेटिंग तिकिटांवरही सुविधा उपलब्ध असेल.

  5. पडताळणी करूनच प्रवासाच्या गरजेनुसार अर्जाला मंजुरी मिळेल.

अर्ज कुठे जमा करायचा?

प्रवासी प्रमुख आरक्षण केंद्रांवर सकाळी ९ वाजल्यापासून अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज थेट अधिकाऱ्यांकडे करा. एजंटमार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच परतीच्या प्रवासाचा अर्ज स्वतंत्र बुकींग म्हणून मानला जाईल. यामध्ये प्रवाशांना प्रवासाचा उद्देश आणि प्रवाशांची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल. यामध्ये गैरवापर टाळण्यासाठी प्रत्येक पानावर अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि शिक्का असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेटवे ऑफ इंडियावर आज ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’; सचिन तेंडुलकर, सद्गुरूंसह अनेक दिग्गजांचा गौरव, बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

Indian Railways : देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

काँग्रेसची जोरदार मुसंडी, झेडपी-पंचायत समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव; किती जिल्ह्यांत सत्ता?

बीडमध्ये कार आणि जीपची समोरासमोर धडक; इंजिन 100 फूट लांब उडून पेट्रोल पंपाजवळ पडलं; Photos

कापसाच्या पिकात गांजाची शेती! नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT