Indian Railway Medical Scheme Saam tv
बिझनेस

Indian Railway Medical Scheme: घाबरु नका, प्रवास करताना अचानक ट्रेनमध्ये तब्येत बिघडली? या ५० रेल्वे स्टेशनवर मिळतील स्वस्तात औषधे

कोमल दामुद्रे

Medical Facilities by Indian Railway: ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. प्रवास करताना तो सुकर व्हावा यासाठी रेल्वे अधिक काळजी घेत असते. इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत नवनवीन सुविधा आणत असते. विमापासून ते तिकीटाचे दर, खाण्यापिण्याची सोय व इतर अनेक गोष्टींमध्ये ती ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विचार करत असते.

अनेक वेळा ट्रेनमधील प्रवासादरम्यान प्रवाशांची तब्येत बिघडते. त्यामुळे लोकांना ट्रेनमधून अचानक उतरावे लागते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत बिघडली तर त्याला आता स्वस्तात औषध मिळू शकतात. रेल्वेने 50 स्थानकांवर स्वस्त औषधी काउंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया रेल्वेची स्वस्त औषध योजना

1. मेडिसिन काउंटर 50 स्टेशनवर असतील

रेल्वे (Railway) मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्थानकांवर प्रवाशांना (Travel) स्वस्तात औषधे (Medicine) उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्यात येणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून देशभरातील 50 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. ज्या जागेवर ही केंद्रे उघडली जातील आणि लोकांना स्वस्तात औषधे मिळू शकतील. मात्र, यासाठी मेडिकल स्टोअर मालकांना परवाना घ्यावा लागणार आहे.

2. २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश

ही केंद्रे 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू केली जातील. मुख्य म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, जम्मू काश्मीर, उत्तराखंड.

3. या ठिकाणी सुरु होणार पंतप्रधान जनऔषधी केंद्र

दीनदयाल उपाध्याय जंक्शन, वीरांगना लक्ष्मीबाई, लखनौ, गोरखपूर, बनारस, आग्रा कँट, मथुरा, ऋषिकेश, काशीपूर, दरबंगा, पाटणा, कटियार, जांगगीर-नायला, बागबर्हा, सिनी, अंकलेश्वर, मेहसाणा, पेंद्र रोड, रतलाम, मदलम बिना, सवाई माधोपूर, भगत की कोठी, फगवाडा आणि राजपुरा ही मुख्य स्थानके आहेत जिथे केंद्रे उघडली जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT