BrahMos Aerospace Google
बिझनेस

Indian Navy: भारतीय नौदलाची ताकद वाढणार! संरक्षण मंत्रालय 200 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करणार

Defence Ministry Will Buy BrahMos Aerospace: संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने 200 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.

Rohini Gudaghe

Indian Navy Defence Ministry Project

संरक्षण क्षेत्रात (Defence Ministry) भारत स्वावलंब होत आहे. या संदर्भात सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने 200 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची ही खरेदी भारतीय नौदलासाठी केली जाणार आहे. यामुळे शत्रूंशी लढण्यासाठी भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केली जातील.

यासंदर्भात बुधवारी सायंकाळी बैठक झाली. भारतीय नौदलासाठी (Indian Navy) हा महत्त्वाचा करार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ब्रह्मोस एरोस्पेस आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात हा करार होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा करार 20 हजार कोटी रुपयांचा आहे.

ब्रह्मोस एरोस्पेस म्हणजे काय

भारत लवकरच फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये करार झाला (Defence Ministry Will Buy BrahMos Aerospace) आहे. ब्रह्मोस एरोस्पेस हा भारत आणि रशिया सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. ब्रह्मोस एरोस्पेस म्हणजे काय, ते आपण जाणून घेऊ या.

संरक्षण क्षेत्रातील हे स्वावलंबन हा पंतप्रधान नरेंद्र यांच्या महत्त्वाच्या मिशनचा भाग आहे. हा उपक्रम ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करतो. ही क्षेपणास्त्रे पाणबुडी, युद्धनौका, विमाने आणि जमिनीवरूनही टाकता (Defence Ministry Project) येतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतीय नौदलाचे प्रमुख शस्त्र आहे. त्याचा वापर जहाजविरोधी आणि हल्ला कारवायांमध्ये केला जातो.

फिलिपाइन्ससोबत महत्त्वपूर्ण करार

जगातील अनेक देशांनी भारतात बनवलेले ब्रह्मोस एरोस्पेस खरेदी करण्यात रस दाखवला आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रचे (BrahMos Aerospace) पहिले ग्राहक म्हणून फिलिपिन्स समोर आले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यात फिलिपाइन्सने स्वारस्य दाखवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपाइन्ससोबत हा करार सुमारे 375 दशलक्ष डॉलर्सचा असेल. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यातीमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढेल.

अलीकडच्या काळात फिलिपाइन्सला चीनच्या डावपेचांचा सामना करावा लागत आहे, पण भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळवल्यानंतर त्याची सामरिक ताकद वाढणार (BrahMos Missile)आहे. चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाइन्स भारताकडून तेजस फायटर जेटही खरेदी करणार असल्याची माहिती आहे. चीनच्या मुत्सद्देगिरीसमोर भारतानेही फिलिपाइन्सला तेजस खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT