बिझनेस

Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

Online Gaming India: भारतीय गेमिंग उद्योगाला नवीन आव्हान सरकार आणत असलेले ऑनलाइन गेमिंग बिल रिअल मनी गेमवर बंदी घालू शकते. अद्याप विधेयकाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Dhanshri Shintre

  • भारतात रिअल मनी गेम्समध्ये पोकर, रमी, फॅन्टसी स्पोर्ट्स आणि कॅसिनो गेम्स प्रमुख आहेत.

  • BGMI, Free Fire, Call of Duty आणि GTA मध्ये बेटिंग नाही, फक्त इन-अॅप खरेदी आहे.

  • सरकार नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयकासंदर्भात रिअल मनी गेम्सवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

  • बंदी पडल्यास २ लाखांहून अधिक नोकऱ्या, परकीय गुंतवणूक आणि सरकारच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.

भारतामध्ये गेमिंगचा अनुभव आता फक्त मनोरंजनापुरताच मर्यादित नाही राहिला आहे, तर लोक आता ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवत आहेत. पूर्वी लोक मोबाईलवर गेम फक्त वेळ घालवण्यासाठी खेळत असतात, मात्र सध्याच्या काळात रिअल मनी गेम्सचा कल वाढला आहे. या गेम्समध्ये खेळाडू खरे पैसे गुंतवतात आणि जिंकल्यावर रोख बक्षीस मिळते. पोकर, रमी, फॅन्टसी क्रिकेट आणि कॅसिनो गेम्स यासाठी प्रमुख उदाहरणे आहेत. यामध्ये UPI, कार्ड किंवा वॉलेटद्वारे पैसे गुंतवले जातात, आणि जिंकल्यावर रोख थेट खेळाडूच्या खात्यात येतो.

BGMI, Call of Duty, Free Fire किंवा GTA सारखे फर्स्ट पर्सन शूटर गेम्स रिअल मनी गेमिंगमध्ये येत नाहीत, कारण येथे बेटिंग नाही, फक्त इन-अॅप खरेदी करून स्किन्स किंवा गन अपग्रेड करता येतात. रिअल मनी गेम्स आणि अशा फ्री गेम्समध्ये मुख्य फरक म्हणजे पहिले पैशांची गुंतवणूक आवश्यक आहे आणि जिंकल्यास रोख रक्कम मिळते, तर दुसऱ्या प्रकारात कोणताही सट्टा नाही.

भारतामध्ये रिअल मनी गेम्स एक मोठा उद्योग बनला आहे, ज्यावर आधारित अनेक स्टार्टअप्स उभे राहिले आहेत. या क्षेत्रातून सरकारला दरवर्षी २० हजार कोटी रुपयांचा कर लाभ मिळतो. गेल्या काही वर्षांत सुमारे ४० स्टार्टअप्स आले असून २५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे.

सरकार ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन विधेयक तयार करत आहे, ज्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विधेयकात रिअल मनी गेम्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे २ लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात आणि सरकारच्या तिजोरीवरही परिणाम होऊ शकतो. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की अशा बंदीमुळे नोकऱ्या तर जातीलच, पण गुंतवणूकदारांचा विश्वासही कमी होईल. सध्या या विधेयकासंदर्भात अधिकृत माहिती सरकारकडून मिळालेली नाही, त्यामुळे गेमिंग उद्योगात अनिश्चितता कायम आहे.

रिअल मनी गेम्स म्हणजे काय?

रिअल मनी गेम्स म्हणजे असे ऑनलाइन गेम्स ज्यामध्ये खेळाडू खरे पैसे गुंतवतात आणि जिंकल्यास रोख बक्षीस मिळते.

BGMI, Call of Duty आणि Free Fire रिअल मनी गेम्समध्ये का नाहीत?

हे फर्स्ट पर्सन शूटर गेम्स आहेत ज्यामध्ये बेटिंग नाही; फक्त इन-अॅप खरेदीसाठी पैसे द्यावे लागतात.

सरकारचे नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयक काय सांगते?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विधेयकात रिअल मनी गेम्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे.

रिअल मनी गेम्सवर बंदी पडली तर परिणाम काय होतील?

अंदाजानुसार २ लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ शकतो, आणि सरकारच्या तिजोरीवरही परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT