Rupee vs Dollar साम टीव्ही मराठी
बिझनेस

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Indian rupee fall : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, परदेशी गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक तणावामुळे रुपयावर दबाव वाढला आहे.

Namdeo Kumbhar

why Indian rupee is falling against dollar : आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्याचे दिसतेय. आज मार्केट उघडताच रुपयाने आतापर्यंतचा सर्वात निचांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ९६.३३ वर घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत चिंतेचे वातावरण आहे. डॉलर अधिक मजबूत होत असताना भारतीय चलन मात्र अक्षरशः गटांगळ्या खाताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुपया लवकरच १०० चा टप्पा (शतक) ओलांडणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण भारतीय चलनाची किंमत इतक्या वेगात का घसरत आहे? त्यामागील नेमकी कारणे काय आहेत? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार, ते सविस्तर जाणून घेऊया... (Rupee vs Dollar)

रुपया घसरण्याची मुख्य कारणे काय?

  • आखाती देशातील संकट

  • कच्च्या तेलाचा भडका

  • परदेशी गुंतवणूकदारांची पाठ (FII Outflows)

  • मजबूत अमेरिकन डॉलर

  • महागाई वाढणार

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. आखाती देशातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती ११० डॉलर प्रति बॅरेलवर पोहचल्या आहेत, याचा परिणाम जागतिक बाजारात झाल्याचे दिसतेय. कच्चे तेल महागल्याने डॉलर अधिक मजबूत झाला, पण दुसरीकडे रूपया मात्र घसरल्याचे चित्र आहे. भारत जवळपास ९० टक्के कच्च तेल डॉलरमध्ये आयात करतो. आखाती देशातील संघर्षामुळे कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यातच विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा सपाटाला लावला आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात झाल्याचे दिसतेय.

तेलाच्या वाढत्या किमती, वाढती व्यापार तूट, थेट परकीय गुंतवणुकीचा कमी ओघ आणि सततची जागतिक अनिश्चितता यामुळे भारताचा रूपयाची किंमत जागतिक बाजारात घसरत असल्याचे रेक्स व्यापाऱ्यांनी TOI ला सांगितले. अमेरिका-इस्त्राइल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम भारतीय रूपयांवर पडला. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तणावग्रस्त वातावरण आहे, कच्च्या तेलाची जहाजे भारताकडे येत नाही, त्यामुळे इंधनाचा तुटवडा वाढलाय. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो.

इराण-इस्त्रइल यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या भीतीमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीही प्रति बॅरल ११० डॉलरच्या जवळपास पोहोचल्या. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ होत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताचा आयात खर्च वाढतो, डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. मॉर्गन स्टॅनलेच्या एका अहवालानुसार, २०२६ च्या सुरुवातीला भारताने आपल्या गरजेच्या सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आणि अंदाजे ५० टक्के नैसर्गिक वायू आयात केला होता.

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि महागाईच्या चिंतेमुळे रुपयाचा कल नकारात्मक राहत आहे. डॉलर मजबूत होतोय, त्यातच गुंतवणूकदार (FII) भारतामधून पैसा काढत आहेत. त्यामुळे जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारही कमजोर राहिला. चालू वर्षात रुपयामध्ये तब्बल ६ ते ७ टक्क्यांची घसरण झाली असून, आशियाई बाजारपेठेत सर्वात खराब कामगिरी करणारे चलन म्हणून रुपयाची नोंद झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास रुपया लवकरच 'शतक' (१०० रुपये प्रति डॉलर) पार करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्यांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

कच्च्या तेलाची आयात महाग झाल्याने देशात डिझेल-पेट्रोलच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होऊ शकते. परिस्थिती अशीच राहिली तर परदेशी शिक्षण आणि प्रवास महागण्याची शक्यता आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग आयात करावे लागत असल्याने या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT