Pink Railway Station  Saam Tv
बिझनेस

Pink Railway Station : महाराष्ट्रातील पहिलं 'गुलाबी रेल्वेस्थानक', इथे फक्त महिला कर्मचारीच कारभार सांभाळतात

New Amravati Railway station : न्यू अमरावती स्थानक' हे भुसावळ विभागातील पहिले स्थानक आणि गुलाबी स्थानक बनणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक आहे.

कोमल दामुद्रे

Central Railway : अनेकांचा प्रवास सोपा व सोयीस्कर करणारी वाहतूक अर्थात रेल्वे. खिशाला परवडणारी पण सहज पोहोचता येणारे साधन. भारतात कोट्यावधी प्रवासी ट्रेनने प्रवास करतात.

आजपर्यंत आपण फक्त रेल्वेत काम करताना पुरुषवर्गाला पाहिले असेल पण तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रातील काही ठिकाणी रेल्वेमध्ये महिला वर्ग काम करताना दिसातात. महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. गृहिणीपासून ते कामाच्या ठिकाणी. शिक्षण, घरकाम, ऑफिस व अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामध्ये महिला या पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच आहेत.

महाराष्ट्रातील (Maharashtra) अशी काही ठिकाणं आहेत जिथे संपूर्णपणे महिला कर्मचारी रेल्वेचा कारभार सांभाळतात. महिला कर्मचाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मध्ये रेल्वे नेहमीच पुढे असते. अशातच मुंबई विभागातील माटुंगा स्थानक व त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक स्थापन करणारे भारतीय रेल्वेचे (Railway) पहिले झोन असण्याचा मान आहे.

त्यातच 'न्यू अमरावती स्थानक' हे भुसावळ विभागातील पहिले स्थानक आणि गुलाबी स्थानक बनणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक आहे. संपूर्णपणे महिला (Women) कर्मचारी इथला कारभार सांभाळतात.

मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, भुसावळ विभागातील सर्व महिला स्थानक म्हणून न्यू अमरावती स्थानक स्थापन करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील पहिले "पिंक स्टेशन" आणि संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे तिसरे स्थानक असलेल्या न्यू अमरावती स्थानकात 4 उप स्टेशन अधीक्षक, 4 पॉइंट वुमन, 3 रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि 1 स्टेशन तिकीट बुकिंग एजंट, 12 महिला कर्मचारी कर्मचारी संख्या. स्टेशनवर दररोज अंदाजे 380 प्रवासी येतात आणि दररोज 10 ट्रेन चालतात/पास करतात. याबाबतची माहिती प्रसिद्धी जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT